Gopichand Padalkar l आज सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथील मारकडवाडी गावात महायुतीच्या नेत्यांची सभा पार पडली आहे. या सभेदरम्यान जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर एकेरी भाषेत जोरदार टीका केली आहे.
गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर जोरदार टीका :
राज्यात धनगर समाज लोकशाही विरोधात वातावरण तयार केले. कारण 100 शकुनी मेल्यावर एक शरद पवार जन्माला आला आहे. मात्र यावेळी मारकडवाडी मतदारसंघात 100 गावं आहेत पण हेच गाव निवडले. कारण धनगर समाज लोकशाही मानत नसल्याचं दाखवण्याचा प्रयत्न शरद पवाराने केले असं आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.
याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ‘खरे’ चप्पल घालून बाहेर पडेपर्यंत राहुल गांधींचे खोटे गावभर फिरून येत आहेत. तसेच देवभाऊचे खरे बाहेर पडेपर्यंत शरद पवार यांचे खोटे देखील गावभर फिरून येत आहेत. तसेच मारकडवाडीत पवार आले तेव्हापासून शरद पवारांची अक्कल आता संपली असल्याचं पडळकर म्हणाले आहेत.
Gopichand Padalkar l ईव्हीएममध्ये घोळ कसा झाला? :
यावेळी गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांना आवाहन दिल आहे. शरद पवार यांनी निवडणुका कश्या प्रकारे होतात. त्याबाबत आमदारांचे प्रशिक्षण घ्यावे आणि मैदानात यावे. तसेच ईव्हीएममध्ये घोळ कसा झाला ते देखील सांगावे असं गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.
तसेच आत्ता आंदोलन करणाऱ्यांना विनंती आहे की, तुम्ही राज्यात चुकीचा पायंडा पाडत आहात. हे सरंजामशाही मोहिते पाटील स्वतःला राजे मानतात. तसेच ज्यावेळी मी बारामतीत उभा होतो तेव्हा माझे डिपॉजिट जप्त झाले. त्यामुळे जर मग EVM घोळ असता तर मी पराभूत झालो असतो का? असा सवाल देखील पडळकरांनी उपस्थित केला आहे.
News Title : Malshiras Markadwadi Gopichand Padalkar Criticized on Sharad Pawar
महत्वाच्या बातम्या –
तिने ऑफिसमध्ये जे पाहिलं… राज कुंद्राबद्दल सर्वात मोठा खुलासा
‘..हा तर क्षत्रियांचा अपमान’; पुष्पा-2 च्या निर्मात्यांना थेट धमकी, नेमकं झालं काय?
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ तारखेला पाणीपुरवठा बंद राहणार






