Malaika Arora Father Death l प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा हिचे वडील अनिल मेहता यांचा काल मृत्यू झाला आहे. या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. अनिल मेहता यांच्या मृतदेहाचे कूपर रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे. अशातच आता मलायका अरोराच्या वडिलांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला आहे. ज्यामध्ये अनिल मेहता यांच्या मृत्यूचे कारण काय होते हे समोर आले आहे.
मलायकाच्या वडिलांचा मृत्यू कशामुळे झाला? :
प्राथमिक अहवालात त्यांच्या मृत्यूचे कारण अनेक जखमा असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचा अहवाल फॉरेन्सिक लॅबकडे देखील पाठवण्यात आला आहे. अनिलच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम काल रात्री आठच्या सुमारास करण्यात आले. तसेच मलायकाच्या वडिलांवर आज दुपारी अंत्यसंस्कार होणार आहेत.
काल म्हणजेच 11 सप्टेंबर रोजी अनिल मेहता यांचा घराच्या बाल्कनीतून पडून मृत्यू झाला आहे. अनिलने आत्महत्या केल्याचा दावा करण्यात आला असला तरी अद्याप पोलिसांनी याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.
Malaika Arora Father Death l बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली :
मिळालेल्या माहितीनुसार, मलायकाचे वडील अनिल हे इमारतीतून ज्या ठिकाणी कोसळले तिथे रक्त मिळालं आहे. अनिल मेहता हे नेहमी बाल्कनीत बसून पेपर वाचायचे. तसेच लिव्हिंग रुममध्ये त्यांची चप्पल होती. जेव्हा आम्ही बाल्कनीतून पाहिलं तेव्हा वॉचमन मदतीसाठी जोरजोरात ओरडत होता असं मलायकाच्या आईने पोलिसांना सांगितलं आहे.
मलायकाच्या वडिलांच्या निधनामुळे संपूर्ण बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. यावेळी मलायका आणि तिच्या कुटुंबियांना पाठिंबा देण्यासाठी सर्वजण त्यांच्यासोबत उभे आहेत. मलायकाच्या घरी बॉलिवूड सेलिब्रिटी भेट देत आहेत. मात्र या घटनेच्या वेळी मलायका शहरात नसली तरी तिच्या वडिलांच्या निधनाची बातमी समजताच अभिनेत्री तातडीने मुंबईला परतली आहे.
News Title – Malaika Arora Father Death Report
महत्त्वाच्या बातम्या-
झिका व्हायरस वेगाने फोफावतोय; मुंबई, पुण्यासह कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण?
पंकजा मुंडेंनंतर धनंजय मुंडेंची बारी?, शरद पवार नवा डाव टाकण्याच्या तयारीत
राज्यात पुन्हा मविआची सत्ता येणार, 180 जागा जिंकणार; कुणी केला दावा?
“..तर तुझाही आजीसारखाच गेम करू”; भाजप नेत्याची राहुल गांधींना थेट धमकी
ऐन सणा सुदीच्या मुहूर्तावर सोनं महागलं, जाणून घ्या आजचे दर






