Malaika Arora Father Death | बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा हिला मोठा धक्का बसला आहे. मलायका हिच्या वडिलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मलायकच्या वडिलांनी वांद्रे येथील इमारतीवरून उडी मारून आयुष्य संपवलं.
आलमेडा पार्क या इमारतीच्या 6 व्या मजल्यावरून उडी मारून त्यांनी आत्महत्या (Malaika Arora Father Death) केली. बुधवारी सकाळी ही दुर्दैवी घटना घडली आहे. त्यांनी हे का केलं, आत्महत्येचं कारण नेमकं काय हे अद्याप अस्पष्ट आहे. पोस्टमॉर्टमसाठी त्यांचा मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
मलायकाला तिच्या वडिलांच्या निधनाची बातमी मिळाली तेव्हा ती पुण्यात होती. माहिती मिळताच ती मुंबईला रवाना झाली आहे. तसेच अरबाज देखील त्याच्या कुटुंबासह घटनास्थळी पोहोचला आहे.
अनिल अरोरा यांनी आत्महत्या केली तेव्हा मलायका अरोरा घरी नव्हती. आज सकाळी त्या पुण्यात होत्या. घटनेची माहिती मिळताच ती मुंबईहून पुण्याकडे रवाना झाली. या बातमीनंतर अनेक सेलेब्स देखील तिच्या घरी पोहोचत आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून अनिल अरोरा यांना प्रकृतीच्या त्रासामुळे मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मलायका आई जॉयससोबत हॉस्पिटलमध्ये दिसली होती. मात्र, त्यांच्यावर उपचाराचं कारण स्पष्ट होऊ शकलं नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
संकेत बावनकुळेंच्या हॉटेल बिलमध्ये बीफ कटलेट, मटन अन् ..; संजय राऊतांनी हिंदुत्वावरून सुनावलं
कुठे अतिवृष्टी तर कुठे विश्रांती; राज्यात आज कसं राहील हवामान?
अजितदादा बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवायला घाबरतायेत, कारण…;
पुणे शहरातील ‘हे’ प्रमुख रस्ते आजपासून बंद राहणार; ‘या’ पर्यायी मार्गांचा करा वापर






