मलाइका अरोराच्या वैयक्तिक आयुष्यातील धक्कादायक खुलासा, जे ऐकून तुम्हीही थक्क व्हालं

On: September 17, 2025 11:18 AM
Malaika Arora
---Advertisement---

Malaika Arora | बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही कायमच चर्चेत असते. कधी तिच्या कपड्यांमुळे, तर कधी तिच्या नातेसंबंधांमुळे ती ट्रोलिंगची धनी ठरते. अरबाज खानसोबतच्या (Arbaj Khan) घटस्फोटानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूरसोबत (Arjun Kapoor) रिलेशनशिपमध्ये होती. दोघे लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, काही महिन्यांपूर्वीच या नात्याला पूर्णविराम लागला आणि त्यांचे ब्रेकअप झाले. यानंतर आता मलायका पहिल्यांदाच तिच्या खासगी आयुष्याबाबत इतक्या स्पष्ट शब्दांत बोलताना दिसली आहे.

ट्रोलिंगवर सडेतोड उत्तर :

एका मुलाखतीत बोलताना मलायका म्हणाली की, “लोक मला काय करावं आणि काय करू नये हे सांगायचे. माझ्या कपड्यांवरून, नात्यांवरून, अगदी माझ्या कामावरूनही टीका व्हायची. सुरुवातीला हे खूप कठीण होतं. पण एका क्षणानंतर मी स्वत:ला समजावणं थांबवलं आणि दुर्लक्ष करायला सुरुवात केली. त्यानंतर मला खूप मोकळं वाटू लागलं.”

मलायकाने (Malaika Arora) स्पष्टपणे कबूल केले की, टीका आणि अफवांच्या गदारोळामुळे कधी कधी तिला स्वत:वरच संशय यायचा. “अरबाज खानपासून विभक्त झाल्यानंतर मला एक ठराविक लेबल लावलं गेलं. मला बोल्ड म्हणण्यात आलं, बिनधास्त म्हणण्यात आलं. पण जेव्हा सतत माझ्याबद्दल प्रश्न उपस्थित होतात, तेव्हा अनेकदा स्वत:वरच संशय निर्माण होतो. हा मानवी स्वभाव आहे आणि तो कधीच जात नाही,” असं ती म्हणाली.

Malaika Arora | सकारात्मकतेने पुढे जाण्याचा निर्धार :

मलायका पुढे म्हणाली की, “गेल्या काही वर्षांत मी हे सगळं टीका म्हणून न घेता अधिक सकारात्मकतेने स्वीकारलं आहे. आता मला कळलंय की आपण स्वत:साठी जे तयार करतो तेच खरं आणि योग्य असतं.”

ब्रेकअपनंतरही अर्जुन कपूरसोबतची तिची मैत्री कायम असून सध्या ती पूर्ण लक्ष आपल्या कामावर केंद्रीत करत आहे.

News Title: “Malaika Arora Big Revelation: Actress Opens Up on Private Life, Says She Often Doubted Herself”

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now