‘दारूच्या बाटलीवरही…’; FSSAI ला उच्च न्यायालयाने धाडली नोटीस

On: January 31, 2025 11:40 AM
Make Cancer Warning Mandatory On Liquor Bottles Like Cigarette Packs PIL In High Court FSSAI Notice
---Advertisement---

Liquor Bottles | सिगारेटच्या (Cigarette) पाकिटाप्रमाणे दारूच्या बाटल्यांवरही (Liquor Bottles) कॅन्सरचा (Cancer) धोकादायक इशारा (Warning) देणे बंधनकारक (Compulsory) करावे, यासाठी उच्च न्यायालयात (High Court) जनहित याचिका (Public Interest Litigation – PIL) दाखल झाली आहे. या याचिकेवर उच्च न्यायालयाने भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणला (Food Safety and Standards Authority of India – FSSAI) उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. (Liquor Bottles)

दारू सेवनाशी संबंधित आरोग्याचे धोके वाढतात

सिगारेटच्या पाकिटाप्रमाणे दारूच्या बाटल्यांवर कॅन्सरबाबत कोणताही धोकादायक इशारा न दिल्याने दारू सेवनाशी संबंधित आरोग्याचे धोके वाढतात. ग्राहकांना (Customers) ते वापरत असलेल्या उत्पादनांची पूर्ण आणि अचूक माहिती मिळविण्याचा अधिकार आहे, असे पुण्याचे (Pune) रहिवासी यश चिलवार (Yash Chilwar) (वय 28) यांनी जनहित याचिकेत म्हटले आहे.

30 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू

25 जून 2024 रोजीच्या जागतिक आरोग्य संघटना (World Health Organization – WHO) आणि पॅन अमेरिकन हेल्थ ऑर्गनायझेशनने (Pan American Health Organization) सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे की, मद्यसेवनामुळे (Alcohol Consumption) 30 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यात देशांनी पुढाकार घेऊन हस्तक्षेप (Intervention) करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.

दक्षिण कोरिया (South Korea) आणि आयर्लंडसारख्या (Ireland) देशांनी आधीच दारूच्या बाटल्यांवरील लेबलवर (Label) कॅन्सरसंबंधी धोकादायक इशारा दिला आहे, असे याचिकेत म्हटले आहे. (Liquor Bottles)

दारू सेवनाच्या प्रमाणात लक्षणीय घट होण्याची शक्यता

लोकांना अल्कोहोलसंबंधी आरोग्य धोक्यांबद्दल जागरूकता (Awareness) निर्माण केल्यास दारू सेवन करणाऱ्यांच्या प्रमाणात लक्षणीय घट होईल, असे याचिकेत म्हटले आहे. (Liquor Bottles)

थोडक्यात, दारूच्या बाटल्यांवरही सिगारेटच्या पाकिटांप्रमाणे कॅन्सरचा धोकादायक इशारा देणे बंधनकारक करण्याची मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली असून, न्यायालयाने FSSAI ला उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. या याचिकेमुळे दारू सेवनाशी संबंधित आरोग्याच्या धोक्यांबाबत जागरूकता वाढण्याची शक्यता आहे.

Title : Make Cancer Warning Mandatory On Liquor Bottles Like Cigarette Packs PIL In High Court FSSAI Notice

 

Join WhatsApp Group

Join Now