फडणवीसांना नाहीतर ‘या’ महिला नेत्याला मुख्यमंत्री करा! कोणी केली मागणी

On: November 26, 2024 5:27 PM
Nagarparishad Elections Results
---Advertisement---

Maharashtra l राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष हे सत्ता स्थापनेकडे लागले आहे. अशातच आता महायुती सरकारचा शपथविधी कधी होणार? तसेच या मंत्रिमंडळात कोणाकोणाला संधी मिळणार याच सर्वत्र चर्चा रंगली आहे. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही आहेत. तर दिल्लीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळत आहे. अशातच भाजपच्या महिला नेत्याला मुख्यमंत्री करा अशी मागणी ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या नेत्याने केली आहे.

ओबीसी आरक्षण बचाव समितीने केली मागणी :

यावेळी ओबीसी आरक्षण बचाव समितीचे नेते मंगेश ससाणे म्हणाले की, ओबीसींना विरोध करणारा मुख्यमंत्री आम्हाला नको आहे. कारण मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटीलचा खुटा ओबीसीने उपटला आहे. तसेच महायुतीसाठी ओबीसी समाज हा निर्णायक ठरला आहे. त्यामुळे ओबीसी समाजाला मुख्यमंत्री पद द्यावं असं ससाणे यांनी म्हटलं आहे.

याशिवाय छगन भुजबळ किंवा पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री कराव अशी आम्ही मागणी करत असल्याने महायुतीने देखील याचा विचार करावा अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला देखील फटका बसेल. त्यामुळे आम्हाला वाटत नाही लक्ष्मण हाके यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळेल. परंतु भेटलं तर स्वागत आहेच असं मंगेश ससाणे म्हणाले आहेत.

Maharashtra l महायुती सरकारचा शपथविधी कधी होणार? :

राज्यात मुख्यमंत्रिपदाबाबत सध्या प्रचंड चर्चा पाहायला मिळत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती देखील मिळाली आहे. त्यामुळे आता लवकरच महायुती सरकारचा शपथविधी होणार आहे. तसेच या शपथविधी दरम्यान 20 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं देखील बोललं जात आहे.

यामध्ये भाजपचे 10, शिवसेना शिंदे गटाचे 6 तर अजित पवार गटाचे 4 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र यासंदर्भात अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

News Title – Make a woman leader the Chief Minister, Mangesh Sasane’s demand

महत्वाच्या बातम्या-

नव्या सरकारच्या शपथविधीची तारीख ठरली! कधी होणार?

आधारकार्ड संदर्भात महत्वाची माहिती; नागरिकांना होणार फायदाच फायदा

“तो माझं तोंड बंद…”, लग्नाच्या पाच महिन्यानंतर पती जहीरबद्दल सोनाक्षीचा गौप्यस्फोट!

राजकारणात मोठा ट्विस्ट, भाजपकडून मास्टरप्लॅन, एकनाथ शिंदेंना मोठी जबाबदारी मिळणार?

मतमोजणीत झालायं मोठा घोळ; आव्हाडांनी सादर केली धक्कादायक आकडेवारी

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now