भारतीय लष्कराची मोठी कारवाई; पाकिस्तानची रडार यंत्रणा केली उद्ध्वस्त

On: May 8, 2025 6:06 PM
indian army pakistans radar system
---Advertisement---

Indian Army | पाकिस्तानने भारतातील ४ राज्यांमधील १५ शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir), पंजाब, गुजरात आणि राजस्थान ही राज्ये पाकिस्तानच्या निशाण्यावर होती. ७-८ मे २०२५ च्या रात्री पाकिस्तानने अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू , पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड (Chandigarh), नल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज (Bhuj) या उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक लष्करी ठिकाणांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, एकात्मिक काउंटर यूएएस ग्रिड आणि हवाई सुरक्षा प्रणालीद्वारे (air defence system) हे हल्ले निष्फळ ठरवण्यात आले. या हल्ल्यांचे अवशेष आता अनेक ठिकाणांहून सापडत असून ते पाकिस्तानी हल्ल्यांची साक्ष देत आहेत.

भारताकडून पाकिस्तानची हवाई सुरक्षा यंत्रणा उद्ध्वस्त

भारताने या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर देत पाकिस्तानची हवाई सुरक्षा यंत्रणा उद्ध्वस्त केली आहे. यासाठी भारताने हेरॉन ड्रोनचा (Heron drone) प्रभावीपणे वापर केला. आज सकाळी भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील अनेक ठिकाणी हवाई सुरक्षा रडार आणि प्रणालींना लक्ष्य केले. भारताने पाकिस्तानप्रमाणेच त्याच तीव्रतेने आणि क्षमतेने प्रत्युत्तर दिले आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लाहोरमधील (Lahore) हवाई सुरक्षा प्रणाली पूर्णपणे निष्क्रिय करण्यात आली आहे. दुसरीकडे, पंजाबच्या फिरोजपूर सेक्टरमध्ये (Firozpur sector) काल रात्री सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानांनी एका पाकिस्तानी घुसखोराला कंठस्नान घातले. हा पाकिस्तानी घुसखोर अंधाराचा फायदा घेत सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करत होता, परंतु BSF जवानांनी त्याला वेळीच ओळखले आणि गोळीबार करून ठार केले.

लाहोरमधील हवाई सुरक्षा यंत्रणा निष्प्रभ

भारतीय सशस्त्र दलांनी आज सकाळी पाकिस्तानमधील लाहोरसह अनेक ठिकाणांवरील हवाई सुरक्षा रडार आणि प्रणालीला लक्ष्य केले. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय सैन्याने लाहोरची हवाई सुरक्षा प्रणाली पूर्णपणे निष्प्रभ केली आहे. पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबाराला भारतीय सैन्याने त्याच प्रमाणात आणि तितक्याच तीव्रतेने प्रत्युत्तर दिले आहे.

याआधी पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा (Kupwara), बारामुल्ला (Baramulla), उरी (Uri), पूंछ (Poonch), मेंढर (Mendhar) आणि राजौरी (Rajouri) सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर अंदाधुंद गोळीबार आणि तोफांचा मारा केला होता, ज्यात १६ नागरिकांनी आपला जीव गमावला होता. मृतांमध्ये ३ महिला आणि ५ मुलांचा समावेश होता. या हल्ल्याला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले होते. आता या प्रत्युत्तराचा भाग म्हणून भारताने लाहोरमधील पाकिस्तानची हवाई सुरक्षा प्रणाली नष्ट केली आहे. भारत सरकारने या कारवाईवर अधिकृत निवेदन जारी केले असून, त्यात म्हटले आहे की, आज सकाळी भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील अनेक ठिकाणी हवाई सुरक्षा रडार आणि प्रणालींना लक्ष्य केले. भारताने पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले आहे.

 Title : Major Action by Indian Army! Pakistan’s Radar System Destroyed, Attack Attempt Foiled

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now