शरद पवार गटाचे नेते महेश कोठे यांचं निधन!

On: January 14, 2025 12:21 PM
Mahesh Kothe Pass Away
---Advertisement---

Mahesh Kothe Pass Away l मकर संक्रांतीच्या शुभ दिनी एक दुःखद बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते महेश कोठे यांचे हृदयविकाराने निधन झालं आहे. महेश कोठे हे सोलापूरचे माजी महापौर होते. महेश कोठे हे उत्तरप्रदेशच्या प्रयागराज येथे कुंभमेळासाठी गेले असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचं निधन झालं आहे.

महेश कोठे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन :

महेश कोठे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. त्यामुळे आता त्यांचं पार्थिव प्रयागराजहून सोलापुरात विमानाने आणण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच सोलापूर शहर उत्तर मधून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी त्यांचा पराभव केला होता.

महेश कोठे हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासातील नेते होते. तसेच महेश कोठे यांची सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ राजकीय नेते म्हणून ओळख होती. मात्र आता महेश कोठे यांच्या निधनानं कोठे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तसेच राजकारणातला सर्वात तरुण महापौर असलेला आणि शरद पवारांच्या अत्यंत जवळचा नेता हरपल्याची भावना राजकीय नेत्यांमधून व्यक्त केली जात आहे.

Mahesh Kothe Pass Away l महेश कोठेंची राजकीय कारकीर्द :

महेश कोठे यांनी 2021 मध्ये शिवसेनेला रामराम करुन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. अगदी तेव्हापासून ते राष्ट्रवादी काँग्रेससाठी काम करत होते. याशिवाय राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर देखील महेश कोठे यांनी शरद पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेतला होता.

मात्र राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र या निवडणुकीत सोलापूर उत्तर मतदारसंघातून विजय देशमुख यांनी त्यांचा दारुण पराभव केला होता.

News Title : Mahesh Kothe Pass Away

महत्वाच्या बातम्या –

शेतकऱ्यांनो ‘ही’ कामाची गोष्ट लवकर करा अन्यथा… पश्चाताप होईल

वाल्मिक कराडला फाशी द्या! ‘या’ आमदाराने केली मागणी

जरांगेंना मिठी मारून धनंजय देशमुख ढसाढसा रडले, नेमकं काय घडलं?

संतोष देशमुखांना ‘या’ व्यक्तींनी दिली होती जीवे मारण्याची धमकी!

आजपासून महाकुंभ मेळ्याला सुरवात! जाणून घ्या शाही स्नानाच्या तिथी

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now