सत्तेसाठी खटपट सुरु; निकालापूर्वीचं महायुतीने ‘प्लॅन बी’ आखला

On: November 22, 2024 3:35 PM
Maharashtra
---Advertisement---

Maharashtra l राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यासाठी अवघे काही तास बाकी आहेत. कारण उद्या (23 नोव्हेंबरला) सकाळी 8 वाजता महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघांमध्ये मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मात्र आता या पार्श्वभूमीवर महायुतीच्या गोटात हालचालींना जोरदार सुरुवात झाली आहे.

महायुतीचा प्लॅन ‘बी’ काय? :

निवडणूक झाल्यानंतर एक्झिट पोलचे निकाल समोर आल्यानंतर महायुतीने प्लॅन बी आखायला सुरवात केली असल्याची माहिती मिळाली आहे. कारण आता महायुतीला विधानसभा निवडणुकीत बहुमतापासून दूर राहिल्यास राज्यातील छोट्या पक्षांसोबत हातमिळवणी करावी लागणार आहे.

कारण महायुतीतील नेतेमंडळी पक्ष स्थापन करण्यासाठी जे पक्ष महायुतीत नाहीत अशा पक्षांसोबत संपर्क साधत आहेत. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही कोणत्याही अपक्षांच्या संपर्कात नसल्याचे वक्तव्य काल केले होते. मात्र, महायुतीच्या गोटातून अपक्ष आणि बंडखोरांनी संपर्क साधण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती मिळाली आहे.

Maharashtra l राज्यात कोणतं सरकार येणार? :

विधानसभा निकालापूर्वीचं महायुतीचे नेते छोट्या घटकपक्षांशी बोलणी करत आहेत. कारण केंद्रात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात सत्तेतील वाटा देऊन घटक पक्षांना जवळ करण्याचा महायुतीचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीकडून देखील सत्ता स्थापन करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. मात्र राज्यात कोणतं सरकार येणार? हे मात्र निकालानंतरच जाहीर होणार आहे.

News Title –mahayuti start contact with independent candidates

महत्त्वाच्या बातम्या-

…तर मनोज जरांगेंना पुन्हा उपोषण करण्याची वेळ येणार नाही

‘राज’पुत्र अमित ठाकरे आमदार बनणार?, माहीममध्ये यंदा कोण मारणार बाजी?

महाराष्ट्रातील ‘हे’ मतदारसंघ ठरू शकतात जायंट किलर!

निकालापूर्वीच शरद पवार ॲक्शन मोडवर; उमेदवारांना दिल्या महत्त्वाच्या सूचना?

विद्यार्थ्यांनो… दहावीच्या पासिंग मार्कांमध्ये पुन्हा बदल?

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now