राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार, शपथविधीबाबत मोठी अपडेट समोर

On: November 23, 2024 4:41 PM
Cabinet Ministry Formula
---Advertisement---

Mahayuti Government | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. महाराष्ट्रात महायुती सरकारला मोठा विजय मिळाला आहे. तर महाविकास आघाडीची जोरदार पिछेहाट झाली आहे. युतीमध्ये भाजपा हा मोठा भाऊ ठरला आहे. भाजपने जवळपास 130 जागांवर आघाडी घेतली आहे. तर, शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार 54 जागांवर आघाडीवर आहेत, दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाने देखील उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली आहे. (Mahayuti Government )

महाविकास आघाडीला महाराष्ट्रात जोरदार धक्का बसला आहे. महाविकास आघाडीतील तीनही प्रमुख घटक पक्ष मिळून 75 चा आकडा देखील गाठू शकलेले नाहीत. लोकसभेला मविआला चांगलं यश मिळालं. पण, विधानसभेत ही कामगिरी खूपच वाईट दिसून आली. राज्यात प्रथमच असं होणार की, कोणत्याच पक्षाचा विरोधी पक्षनेता नसणार आहे. कारण यासाठी 29 जागा असणे आवश्यक आहे.

महायुतीचा दणदणीत विजय

मात्र, मविआमध्ये कोणत्याच पक्षाला इतक्या जागा मिळालेल्या नाहीत. दुसरीकडे, महायुती आता पुन्हा एकदा सत्ता स्थापनेसाठी तयार झाली आहे. येत्या सोमवारी किंवा मंगळवारी नव्या सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. आता नव्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार? मुख्यमंत्री कोण होणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

निकाल लागल्यानंतर काहीच तासांपूर्वी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली. एखाद्याला जर जाणून बुजून टार्गेट करण्यात आलं तर ते लोकांच्या लक्षात येतं. महाविकास आघाडीनं फेक नॅरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला पण यावेळी तो फसला, असं फडणवीस म्हणाले. (Mahayuti Government )

लाडकी बहीण योजना ठरली गेमचेंजर

तर, अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना हे गेमचेंजर ठरली, असं म्हटलं. “आता आमच्यावर जबाबादारी वाढली आहे. इतकं मोठं यश महाराष्ट्रात कोणाला मिळालं नव्हतं. आमच्या पाठिंशी केंद्र सरकार आहे. त्यामुळे मोठा आधार आहे. लोकसभेचा निकाल लागला तर तो बरोबर आणि इथला निकाल लागला की बॅलेट पेपर आलं पाहिजे.असं नसतं.”, असं म्हणत अजित पवार यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना टोला लगावला. राऊत यांनी निवडणुकीत गडबड झाल्याचा आरोप आज सकाळी केला होता.

तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा ऐतिहासिक विजय असल्याचे म्हटले आहे. लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी या योजनेमुळे ऐतिहासिक विजय मतदारांनी दिला. गेल्या 2 वर्षात जे आम्ही काम केलं. जे निर्णय घेतले ते इतिहासातील न भुतो आणि न भविष्यती असे निर्णय होते, असं शिंदे म्हणाले. (Mahayuti Government )

News Title : Mahayuti Government 2024 

महत्वाच्या बातम्या – 

288 मतदारसंघांचा निकाल पाहा एकाच ठिकाणी, फक्त एका क्लिकवर

निकालानंतर मुख्यमंत्रिपदाबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य!

काँग्रेसला मोठा धक्का; मुख्यमंत्रिपदाचा दावेदार मानल्या जाणाऱ्या नेत्याचाच पराभव

मविआचे बडे नेतेही ठरले फेल, पाहा पराभूत उमेदवारांची यादी

“संध्याकाळी मी येतो…”, विजयानंतर फडणवीसांना आला ‘त्या’ खास व्यक्तीचा फोन

Join WhatsApp Group

Join Now