जळगावात महायुतीत वादाची ठिणगी, शिंदेंच्या उमेदवाराला भाजपकडूनच आव्हान

On: October 28, 2024 2:26 PM
Maharashtra Cabinet Reshuffle
---Advertisement---

Mahayuti | विधानसभेसाठी उमेदवाऱ्या याद्या जाहीर होत आहेत, तशी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये बडखोरी ही वाढतच चालल्याचं चित्र दिसून येतंय. आता जळगावमध्ये महायुतीमध्ये मोठी बंडखोरी झाली आहे. येथे माजी खासदार ए टी पाटील यांनी एरंडोल पारोळा मतदार संघात शिंदे गटाचे उमेदवार अमोल पाटील यांच्या उमेदवारीला आव्हान दिलंय. (Mahayuti )

ए टी पाटील हे अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार आहेत. इतकंच नाही तर, निवडून आल्यावर भाजपचाच आमदार म्हणून महायुतीला पाठिंबा देणार, असं म्हणत यांनी बंडखोरी केलीये.यामुळे महायुतीमध्ये ठिणगी पडण्याचे स्पष्ट चित्र दिसून येतंय.

जळगावात महायुतीत वादाची ठिणगी

महायुतीमध्ये आम्ही सगळे एकत्र आहोत. मात्र, गेल्या 5 वर्षापासून मतदारसंघातील आमदारांनी कुणालाही विश्वासात घेतले नाही. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहेत. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसाठी काम करण्यास कार्यकर्ते उत्सुक नाहीत. त्यांच्याच पक्षातल्या लोकांमध्ये देखील नाराजी आहे. त्यांच्या पक्षातील काही नेत्यांनी राजीनामे देखील दिले आहेत. त्यामुळे मी हा निर्णय घेतलाय, असं ए टी पाटील म्हणाले आहेत. (Mahayuti)

दुसरीकडे, पारोळा येथीलच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात असलेले डॉ. संभाजी पाटील हे देखील अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत. ते आपला उमेदवारी अर्ज लवकरच भरणार असल्याचं कळतंय. तसेच, शिवसेनातील भगवान महाजन यांनी देखील बंडखोरी पुकारली आहे.यामुळे महायुतीमधूनच एकमेकांना विरोध केला जात असल्याचं यातून दिसून येतंय. तिन्ही पक्षातून बंडखोरी करण्यात आल्याने महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. (Mahayuti )

News Title –  Mahayuti BJP rebelled in Jalgaon Assembly

महत्त्वाच्या बातम्या-

शरद पवारांची मोठी खेळी; ‘या’ जागेवर महायुतीच्या ‘नाकी नऊ’ आणणार

युगेंद्र पवारांनी अर्ज भरल्यानंतर शरद पवार भावूक; नेमकं काय म्हणाले?

वादग्रस्त आयएएस पूजा खेडकरचे वडील ‘या’ भागातून निवडणूक लढवणार

एकही जागा न मिळाल्याने आठवले महायुतीत नाराज?, रिपाई स्वबळावर लढणार?

घरातील ‘या’ तीन वस्तू फेकून द्या; दिवाळीला होईल भरभराट

Join WhatsApp Group

Join Now