भाजपचा उमेदवारच करणार तुतारीचा प्रचार?; ‘या’ नेत्याच्या ट्वीटने खळबळ

On: November 6, 2024 1:31 PM
Mahayuti Amol Mitkari Tweet In discussion
---Advertisement---

Mahayuti | विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने महायुतीसह महाविकास आघाडीच्या प्रचारसभा रंगताना दिसत आहेत. अशात अजित पवार गटाच्या नेत्याने केलेल्या एका ट्वीटने राजकारणात खळबळ उडाली आहे. भाजपचे आष्टी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार सुरेश धस यांच्याबाबत अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. (Mahayuti)

सुरेश धस यांच्या एका वक्तव्यामुळे भाजप आणि अजितदादा गट यांच्यात वाद निर्माण झाला आहे. आष्टी येथे भाजपने सुरेश धस (Suresh Dhas) यांना तिकीट दिलं आहे. तर अजितदादा गटाने विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे यांना संधी दिली होती.यावरून धस यांनी अजितदादा गटावर प्रचंड टीका केली होती.

अमोल मिटकरी यांचं ट्वीट चर्चेत

आष्टीत भाजपला रोखण्यासाठीच अजित पवार यांनी उमेदवार दिला. पण, येथे जनभावना मोठ्या पवारांकडे आहे. घड्याळाचे बारा वाजलेत, येथे तुतारीची हवा असल्याचं धस यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे अजित पवार गट प्रचंड नाराज झाला आहे. सुरेश धस यांच्या याच विधानाचा अमोल मिटकरी यांनी समाचार घेतला आहे. त्यांनी एक खोचक ट्वीट करत त्यांना टोला लगावला आहे.

अमोल मिटकरी यांनी ट्विट करुन सुरेश धस यांना प्रत्युत्तर दिले. “महायुतीचे उमेदवार सुरेश धस यांना लवकरच तुतारीच्या प्रचाराची जबाबदारी मिळणार सुत्रांची माहिती”, असं खोचक ट्वीट मिटकरी यांनी केलंय. या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात आता वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलं आहे. हे ट्वीट जोरदार व्हायरल होत आहे. (Mahayuti)

Amol Mitkari Tweet

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरही सुरेश धस यांनी अजित पवार गटाविरोधातील नाराजी उघडपणे व्यक्त केली होती. अजित पवार गटामुळे लोकसभेत आमचं वाटोळं झालं. तिसरा गडी आला आणि आमचं मोठं नुकसान झालं. लोकसभेची चूक विधानसभेत होऊ नये, असं सुरेश धस म्हणाले होते. (Mahayuti)

News Title –  Mahayuti Amol Mitkari Tweet In discussion

महत्त्वाच्या बातम्या-

सोनं आज स्वस्त झालं की महागलं?, जाणून घ्या तुमच्या शहरातील लेटेस्ट दर

राज्यात विधानसभेला मेहुणे-मेव्हण्यात होणार टशन!

चंद्रकांत पाटलांच्या पुढाकारातून गदिमांच्या स्मारकाचं 70 टक्के काम पूर्ण!

“देवेंद्रजी तुमचे पूर्वज मुघलांची चाकरी करायचे, ही फडणवीसी राज्यात दाखवू नका”

राज्यातील ‘या’ भागात बरसणार पाऊस; IMD चा इशारा

Join WhatsApp Group

Join Now