Mahayuti | महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा बिगूल वाजला आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होणार आहे. कालच, (20 ऑक्टोबर) भाजपाने आपली पहिली उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये 99 नावे असून त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा, राम कदम अशा प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. (Mahayuti )
मात्र, भाजपची यादी जाहीर होताच महायुतीमधील अजित पवार पक्षात बंड सुरू झालं आहे. चिंचवड विधानसभेत महायुतीला मोठा धक्का बसणार असल्याचं चित्र दिसून येतंय. चिंचवड विधानसभेत महायुतीने भाजपच्या शंकर जगतापांना उमेदवारी जाहीर केली आहे. यानंतर राष्ट्रवादीने काही तासांतच बैठक बोलावत नाराजी जाहीर केली.
अजित पवार गटातील समर्थकांमध्ये नाराजी
अजित पवारांच्या समर्थकांनी बंडाची भूमिका घेतली आहे. काहीही झालं तरी आम्हाला भाजपचा प्रचार करायचा नाही, त्यामुळे महाविकास आघाडी आमच्यातील ज्याला उमेदवारी देईल, आम्ही त्यांचाच प्रचार करु. अशी भूमिकाच अजित पवारांच्या समर्थकांनी घेतली आहे. यामुळे महायुतीची चिंता वाढली आहे. (Mahayuti )
या बैठकीत नाना काटे, प्रशांत शितोळे, मयूर कलाटे या इच्छुक उमेदवारांसह माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी दोन दिवसांत पुढची भूमिका जाहीर करण्याचा निर्णय घेतलाय. नाना काटे यांनी यावेळी म्हटलं की, अजितदादांनी आम्हाला मतदारांच्या संपर्कात राहण्यास सांगितलं. आम्ही त्या पद्धतीने काम देखील केलं. मात्र, भाजपचा उमेदवार जाही झाला. आम्हाला दिलेला शब्द फिरवला गेला. त्यामुळे आमची भूमिका ठाम आहे. आमच्यापैकी एक उमेदवार आम्ही देऊ आणि त्याचाच प्रचार करू, अशी भूमिकाच अजित पवार समर्थकांनी घेतली आहे.
चिंचवड विधानसभेत नाराजी नाट्य
आम्हाला आमच्या पक्षासाठी योग्य निर्णय मिळाला नाही तर आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा देखील अजित पवारांच्या समर्थकांनी दिला आहे. तसेच अजित पवार गटातील काही पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांची देखील भेट घेतली आहे. त्यामुळे अजित पवार समर्थक बंड करण्याच्या तयारीत असल्याचं यामुळे बोललं जातंय. याचा अजित पवार यांच्यासह महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. (Mahayuti )
News Title : Mahayuti Ajitdada supporters upset over candidature
महत्वाच्या बातम्या –
सर्दी-खोकल्याने त्रस्त आहात?, ‘हा’ घरगुती उपाय नक्की देईल आराम!
मोठी बातमी! पुण्यातील ‘या’ मेट्रो स्थानकाला भीषण आग, मोदींनी नुकतंच केलतं उद्घाटन
राज्यात पुन्हा मुसळधार, ‘या’ जिल्ह्यांना IMD कडून हायअलर्ट
मोठी बातमी! कॉँग्रेसचे ‘इतके’ उमेदवार निश्चित?, समोर आली यादी
आज सोमवारी, भोलेनाथ कोणत्या राशीवर प्रसन्न होणार?, वाचा राशी भविष्य






