ऐन थंडीत महाराष्ट्रात पावसाचं सावट, यलो अलर्ट जारी

On: December 22, 2024 1:24 PM
Weather Update
---Advertisement---

Weather Update | महाराष्ट्रात पुढील 5 दिवसांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील 5 दिवसांमध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) या संबंधित माहिती दिली आहे.

कोणत्या भागात पाऊस पडणार?

महाराष्ट्रातील कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. 25 ते 29 डिसेंबर दरम्यान या भागात ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता वर्तविली गेली आहे.

Weather Update | पुण्यात हवामान कसं असेल?

पुणे आणि परिसरात पुढील 2 दिवस आकाश निरभ्र राहून धुके पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील 4 ते 5 दिवस दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहून सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे. किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे.

थंडी ओसरली

उत्तर भारतातील थंडीची लाट हळूहळू कमी होत आहे आणि महाराष्ट्रातही थंडी ओसरत आहे. या बदलामुळे नाताळाच्या दिवसात थंडी अनुभवता येणार नाही तर पाऊस अनुभवता येणार आहे. IMD च्या माहितीनुसार, पावसाची शक्यता 26 ते 28 डिसेंबरपर्यंतच्या तीन दिवसांत अधिक आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘या’ प्रसिद्ध आर्ट डायरेक्टरनं उचललं टोकाचं पाऊल?, सिनेसृष्टित एकच खळबळ!

अखेर मंत्रिमंडाळाचं खाते वाटप जाहीर, इथे वाचा संपूर्ण यादी

एकनाथ शिंदेंनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला लगावला!

खातेवाटपाआधीच मंत्री अडचणीत; फडणवीसांच्या वक्तव्याने धनंजय मुंडेंचं टेंशन वाढलं

अजितदादा…धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढून टाका; कोणी केली मागणी?

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now