पुढील २४ तास अतिशय महत्त्वाचे! हवामान विभागाने ‘या’ जिल्ह्यांना वर्तवला पुराचा इशारा

On: September 5, 2025 9:36 AM
Weather Update
---Advertisement---

Weather Update | कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर सतत वाढत असून, मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत आज (५ सप्टेंबर) हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट (Rain orange alert) जाहीर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईपासून रायगडपर्यंत मुसळधार पावसाच्या सरींनी नागरिकांचे हाल झाले आहेत. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रासह शेजारील राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पूरस्थितीचा धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. (Maharashtra Weather Update)

मुंबई, ठाणे, नवी मुंबईला ‘ऑरेंज अलर्ट’ :

मुंबईत दिवसभर हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काही भागांत मात्र जोरदार पाऊस कोसळू शकतो. आकाश ढगाळ राहील व अधूनमधून पावसाचे प्रमाण वाढेल. आजचे कमाल तापमान ३० अंश तर किमान तापमान २५ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. समुद्रावर मध्यम ते जोरदार वेगाचे वारे वाहणार असल्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

ठाणे, नवी मुंबई आणि पालघर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत अतिवृष्टीची शक्यता असल्याने रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या भागांत वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ३४ किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्येही सतर्कता :

रायगड जिल्ह्यासाठीही ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला असून किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. रायगडमध्ये तापमान २४ ते २८ अंशांच्या दरम्यान राहील. दमट हवामानामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास जाणवू शकतो.

दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत आज यलो अलर्ट आहे. येथे हलक्या ते मध्यम सरी पडतील; काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. भरतीची स्थिती असल्याने मच्छिमारांनी विशेष काळजी घ्यावी. (Maharashtra Weather Update)

मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांत पुराचा इशारा देण्यात आला आहे. नद्यांची पाणीपातळी वाढल्याने सखल भागांत पूरस्थिती निर्माण होऊ शकते. शेजारील गुजरात राज्यातही नर्मदा आणि तापी नद्यांना पूर आल्याचे वृत्त असून, नवसारी आणि वलसाड येथे सतर्कतेचा इशारा आहे. तसेच मध्य प्रदेशातील धार, अलिराजपूर, भरवानी आणि इंदूर या जिल्ह्यांनाही जोरदार पावसाचा धोका सांगण्यात आला आहे.

News title : Maharashtra Weather Update | Orange Alert in Mumbai, Thane, Navi Mumbai | Heavy Rainfall Warning

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now