राज्यातील थंडीची चाहूल वाढली! जाणून घ्या कसे असणार हवामान

On: November 11, 2025 9:13 AM
Weather Update
---Advertisement---

Weather Update | राज्यात हळूहळू थंडीचा कडाका वाढताना दिसतोय. मराठवाडा, मध्य आणि उत्तर महाराष्ट्रातील भागात गारठा जाणवू लागला असून सकाळ-संध्याकाळच्या वेळेस थंडीची तीव्रता वाढली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, राज्यात बहुतांशी भागात हवामान कोरडे राहणार आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्यांचा परिणाम तामिळनाडू व दक्षिण भारताच्या किनारपट्टी भागात दिसत आहे.

मुंबई आणि कोकणात मात्र दिवसाच्या सुमारास किंचित उकाडा जाणवतोय. सकाळी आणि रात्री थंडगार वाऱ्यांचा स्पर्श होत असल्याने गुलाबी थंडीची चाहूल मिळत आहे. (Maharashtra Weather Update)

राज्यात थंडीचा गारवा वाढतोय :

उत्तर भारतात सुरू झालेल्या हिमवृष्टीचा परिणाम आता महाराष्ट्रातही जाणवू लागला आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये तापमानात मोठी घसरण झाली असून त्याच शीतलहरी महाराष्ट्रात प्रवेश करत आहेत.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात घट होत आहे. नाशिक, अहिल्यानगर (Ahilyanagar), छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, नांदेड आणि परभणी या भागांमध्ये सकाळ-संध्याकाळच्या वेळी थंडीचा कडाका वाढलेला आहे. तर विदर्भात तापमान झपाट्याने खाली येत असून चंद्रपूर, वर्धा, अकोला आणि अमरावती येथे किमान तापमानात घट नोंदवली गेली आहे.

Weather Update | थंडीची लाट अद्याप नाही, पण गारव्याची तीव्रता वाढली :

सध्या राज्यात अधिकृतरीत्या थंडीची लाट (Cold Wave) घोषित झालेली नाही. मात्र हवामान तज्ज्ञांच्या मते, नोव्हेंबर अखेरीस आणि डिसेंबरच्या सुरुवातीला तापमान आणखी खाली येण्याची शक्यता आहे. थंडीची लाट तेव्हाच घोषित केली जाते, जेव्हा किमान तापमान 10 अंश सेल्सिअसखाली येतं आणि सरासरी तापमानात 4.5 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त घट नोंदवली जाते.

आरोग्य विभागाने नागरिकांना सकाळ-संध्याकाळ बाहेर पडताना गरम कपड्यांचा वापर करण्याचा आणि लहान मुलं तसेच ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

मुंबईत आजचं हवामान (Mumbai Weather Update) :

मुंबई आणि उपनगरात पुढील 24 तासांत आकाश मुख्यतः स्वच्छ राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. समुद्री आर्द्रतेमुळे दुपारच्या सुमारास हलका उकाडा जाणवेल. (Maharashtra Cold Wave)

मात्र सकाळी आणि रात्रीच्या वेळी थंडगार झुळुकींमुळे हवामान आनंददायी राहील. तापमानात थोडी घट होण्याची शक्यता असून, पुढील दोन दिवस मुंबईकरांना गारठ्याचा अनुभव येणार आहे.

News Title: Maharashtra Weather Update: Cold Wave Intensity Rises Across State; Mumbai to Experience Pleasant Chill Today

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now