Maharashtra weather update | राज्यात सध्या पावसाचा जोर ओसरला असला तरी काही भागात अजूनही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गुजरात आणि पश्चिम मध्य प्रदेशवर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. गुजरातमधील चक्रीय स्थितीमुळे आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. कोकण, गोवा, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Maharashtra weather update)
हवामान विभागाने पुढील 5 दिवस पाऊस बरसणार असल्याचा इशारा दिला आहे. आज 30 सप्टेंबररोजी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात देखील काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
आज राज्यात कुठे-कुठे पाऊस होणार?
मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पुढील चार ते पाच दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर व सांगली या जिल्ह्यांमध्ये आजपासून पुढील तीन ते चार दिवस पाऊस होईल. तसेच ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. (Maharashtra weather update)
हवामान विभागाने आज विदर्भातील बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, वर्धा व नागपूर या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा कोणताही अलर्ट दिल देण्यात आला नसला तरी येथे काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.
ऑक्टोबर महिन्यातही पाऊस बरसणार?
राज्यात परतीच्या पावसाचा जोर सध्या ओसरत असून ऑक्टोबर महिन्याच्या सहा तारखेपासून पुन्हा एकदा मुसळधार पाऊस बरसण्याचा अंदाज हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणीला आलेली पिके सहा ऑक्टोबर पर्यंत काढून घ्यावीत, असा सल्ला देखील देण्यात आला आहे. (Maharashtra weather update)
उद्यापासून ऑक्टोबर महिना सुरू होईल. सहा ऑक्टोबरनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढून 13 ऑक्टोबर पर्यंत म्हणजे आठवडाभर राज्यात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. नंतर दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच 16 ऑक्टोबरनंतर पाऊस निरोप घेऊ शकतो.
News Title : Maharashtra weather update 30 september
महत्वाच्या बातम्या –
“गद्दारांना 50 खोके आणि लाडक्या बहीणींना फक्त 1500 रुपये?”, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
आनंद दिघेंप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घात करण्याचा डाव होता?, कुणी केला दावा?
आज सोमवारी, महादेव कोणत्या राशीवर कृपादृष्टी ठेवणार?, वाचा राशीभविष्य
मोठी बातमी! आमदाराच्या मुलावर प्राणघातक हल्ला
एमसी स्टॅनबाबत धक्कादायक बातमी समोर, ‘त्या’ पोस्टने एकच खळबळ






