Maharashtra Weather Update | देशभरात सध्या पावसाचा जोर वाढला आहे. देशातील अनेक राज्यांत सध्या मुसळधार पाऊस बरसत आहे. गुजरात आणि केरळमध्ये तर पावसाने हाहाकार माजवला आहे. येथे अनेक लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. गुजरातमध्ये अजूनही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर, महाराष्ट्रात सध्या कुठे ऊन तर कुठे पाऊस असं वातावरण दिसून येतंय. (Maharashtra Weather Update)
पावसाची रिपरिप जवळपास सर्वच जिल्ह्यात सुरू आहे. तर, अधूनमधून कडक ऊन अशी हवामानाची एकंदर स्थिती पाहायला मिळत आहे. विदर्भात मात्र मुसळधार पाऊस बरसत आहे. हवामान विभागाने पुढील चार दिवस हवामान कसे राहणार, याबाबत महत्वाचा अंदाज वर्तवला आहे.
राज्यात ‘या’ जिल्ह्यात आज बरसणार
हवामान विभागाने आज कोकणातील रायगड, रत्नागिरी तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, तर विदर्भातील अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांत जोरदर पाऊस पडण्याची शक्यता दिली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. (Maharashtra Weather Update)
आज अति तीव्र कमी दाबाचे क्षेत्र उत्तर गुजरातवर सक्रिय आहे. समुद्रसपाटीवरील वाऱ्याची द्रोणिका रेषा दक्षिण गुजरात ते मध्य केरळ किनारपट्टी समांतर असल्याने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. आज रायगड जिल्हा पुणे , सातारा व कोल्हापूर येथील घाट माथ्यावर अति जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे येथे नागरिकांना काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
‘या’ जिल्ह्यांना आज यलो अलर्ट
तसेच, आज पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिथे येलो अलर्ट दिला आहे. मराठवाड्यात देखील जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. जळगाव, छत्रपती संभाजी नगर, अहमदनगर जिल्ह्यात मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासहित वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. (Maharashtra Weather Update)
येथे पुढील चार दिवस जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर उद्यापासून पुढील चार दिवस विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा पाऊस होईल. येथ वाऱ्याचा वेग हा 30 ते 40 किमी असेल.त्यामुळे येथील अनेक भागांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
News Title – Maharashtra Weather Update 28 august
महत्त्वाच्या बातम्या-
फडणवीसांना मोठा झटका, ‘हा’ बडा नेता शरद पवारांच्या गळाला?
आज ‘या’ 3 राशींचा दिवस वरदानासारखा, सर्व इच्छा पूर्ण होतील!
चित्रपटाची ॲाफर आणि हॅाटेलमध्ये नेऊन… अभिनेत्रीच्या आरोपांनी इंडस्ट्री हादरली
आता तुम्ही परत आमदार नाहीत!, भाजप नेत्याने भाजप आमदाराला सुनावल्याने पक्षात खळबळ






