महाराष्ट्रावर तिहेरी संकट; IMD चा ‘हा’ सर्वात मोठा धोका, काय होणार?

On: October 3, 2025 5:42 PM
IMD Weather Update
---Advertisement---

IMD Weather Update | भारतात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागान (IMD)ने दिलेल्या माहितीनुसार देशाच्या समुद्र क्षेत्रात तीन वेगवेगळे कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले आहेत. या प्रणालींमुळे पुढील काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा धोका वाढला आहे. महाराष्ट्रासह तब्बल १४ राज्यांना आयएमडीनं हाय अलर्ट जारी केला आहे. (rain update)

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत आधीच पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. शेतकरी वर्गाला पिकांचं मोठं नुकसान सहन करावं लागलं आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान खात्यानं पुन्हा एकदा राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा इशारा दिल्याने नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. नाशिक, पुणे, कोकणासह विदर्भ-मराठवाड्यात पावसाचा प्रभाव तीव्र होण्याची शक्यता आहे. (IMD Weather Update)

कमी दाबाचा पट्टा निर्माण- आयएमडीचा इशारा :

हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार, सध्या तीन कमी दाबाचे पट्टे सक्रीय झाले आहेत. पश्चिमेला कच्छच्या खाडीत आणि उत्तर-पूर्वेला अरबी समुद्रात दोन पट्टे निर्माण झाले आहेत. तर बंगालच्या उपसागरात तिसरा पट्टा सक्रीय झाला आहे. या तिन्ही प्रणालींमुळे देशभरात हवामान अस्थिर राहणार असून वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा राज्याला देण्यात आला आहे.

या काळात वाऱ्याचा वेग ताशी ५५ ते ६० किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे किनारपट्टी भागात मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच नागरिकांनी घराबाहेर कमी हालचाल ठेवावी, असे आवाहन प्रशासनानं केलं आहे.

IMD Weather Update | पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता :

स्कायमेट वेदरने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पच्छिम बंगाल, झारखंड, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी होऊन नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात मात्र परिस्थिती अधिक चिंताजनक आहे. कारण आधीच पावसामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. नाशिकसह कोकण, पुणे, सातारा या भागांना आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. १० ऑक्टोबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

महाराष्ट्रासह देशभरातील १४ राज्यांना बसलेला पावसाचा तिहेरी फटका आगामी काही दिवस धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलं आहे. पुढील काही दिवस नागरिकांनी सुरक्षित राहणं आणि हवामान खात्याच्या सूचनांचं काटेकोर पालन करणं हाच एकमेव मार्ग असल्याचं स्पष्ट होत आहे.

News title : Maharashtra Weather Update

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now