पुढील काही तास धोक्याचे! ‘या’ जिल्ह्यांना IMD कडून यलो अलर्ट जारी

On: August 20, 2024 1:42 PM
Maharashtra Weather Update 20 august 2024
---Advertisement---

Maharashtra Weather Update | राज्यात पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई, पुण्यात सध्या जोरदार पाऊस बरसत आहे. पुणे शहरासह ग्रामीण भागात देखील गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस धुमाकूळ घालत असल्याचं चित्र आहे. आज 20 ऑगस्टरोजी हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. (Maharashtra Weather Update)

जवळपास सर्वच जिल्हयामध्ये सध्या पावसाचे वातावरण तयार झाले आहे. काही ठिकाणी सकाळपासूनच पाऊस सुरू झाला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड येथे सकाळपासूनच पाऊस बरसत आहे.

हवामान विभागाने आज पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात वीजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना आजही यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर खानदेशातील धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यात देखील वादळी वाऱ्याचा पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे.(Maharashtra Weather Update)

राज्यात जवळपास सर्वच जिल्ह्यांना यलो अलर्ट

त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा पाऊस होईल. येथे वाऱ्याचा वेग हा ताशी 30 ते 40 किमी असेल.

तसेच, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, धाराशिव या जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांनाही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. (Maharashtra Weather Update)

एकंदरीत महाराष्ट्रातील सर्वच जिल्हयामध्ये जोरदार पाऊस बरसणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. बऱ्याच ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह वाडाळी वाऱ्याचा पाऊस होणार आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

News Title-  Maharashtra Weather Update 20 august 2024

महत्त्वाच्या बातम्या –

“तुमच्या दीड हजारांनी काही होणार नाही, आम्हाला न्याय द्या”; बदलापूर अत्याचार प्रकरणी महिलेचा संताप

“बॉयफ्रेंडसोबत फिरायला..”; कोलकाता प्रकरणावर ‘या’ खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य

…त्या दोन चिमुकल्यांची काय चुक? नराधमाने चिमुकल्यांवर शाळेत केला बलात्कार

जयंत पाटील अजितदादांना लवकरच धक्का देणार? नेमकं काय होणार

‘या’ कारणामुळे खाद्यपदार्थांच्या किमतींमध्ये प्रचंड चढ-उतार!

Join WhatsApp Group

Join Now