महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे थैमान; अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

On: September 25, 2025 4:53 PM
Weather Update
---Advertisement---

Weather Update | गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पावसाने अनेक भागात हाहाकार माजवला आहे. शेतकऱ्यांची पिकं पाण्यात बुडाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले असून, ग्रामीण भागात शेतीचे प्रश्न गंभीर झाले आहेत. धरणं आणि नद्या तुडुंब भरल्या आहेत. अशा परिस्थितीत भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे. (Maharashtra Weather Update)

आयएमडीने जाहीर केलेल्या नव्या अंदाजानुसार, शुक्रवारपासून मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढणार आहे. विशेष म्हणजे, शनिवारी राज्यातील ११ जिल्ह्यांकरीता ऑरेंज अलर्ट जारी (Weather Orange Alert) करण्यात आला आहे.

कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा इशारा? :

हवामान विभागानुसार गुरुवार रोजी विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर शनिवारपासून मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा परीसर, कोल्हापूर घाटमाता, सातारा घाट, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

दरम्यान, राज्यात धुळे, नंदुरबार, आणि जळगाव हे तीन जिल्हा सोडून सर्वत्र जिल्ह्यात मुसळधार सरी कोसळण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव राज्यावर पडत असल्याने पुढील काही दिवस मान्सून असाच टिकून राहणार आहे. (Maharashtra Weather Update)

दरम्यान, पुण्यासह मध्य महाराष्ट्रात २८ आणि २९ सप्टेंबर रोजी पावसाचा जोर अधिक वाढेल. पुण्यात पुढील तीन दिवस गडगडाटासह पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. बुधवारी पुण्यात कमाल २९.६ अंश आणि किमान २०.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले.

Weather Update | पिकं पाण्याखाली गेल्याने शेतकरी चिंतेत :

राज्यातील अनेक ठिकाणी आधीच पिकं पाण्याखाली गेल्याने शेतकरी चिंतेत आहेत. काही भागात माती वाहून गेल्याने शेतजमीन उध्वस्त झाली आहे. परिणामी, शेतकरी पावसाचा जोर कमी व्हावा अशी प्रतीक्षा करत होते. मात्र, हवामान खात्याने आणखी काही दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने त्यांची चिंता अजूनच वाढली आहे. (Maharashtra Weather Update)

मान्सून परतीचा प्रवास राजस्थानातून सुरू झाला असला तरी महाराष्ट्रात मात्र अजूनही मान्सून असाच राहणार आहे. त्यामुळे पुढचे काही दिवस पावसाचा जोर कसा आणि किती राहील यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

News title : Maharashtra Weather Update

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now