ऐन थंडीत पावसाच्या सरी बरसणार, राज्यातील ‘या’ भागांसाठी IMD चा हायअलर्ट

On: December 2, 2024 11:02 AM
Maharashtra Weather Update 2 December 2024
---Advertisement---

Maharashtra Weather | बंगालच्या उपसागरात आलेल्या फेंगल चक्रीवादळामुळे अनेक राज्यांना फटका बसला आहे. तमिळनाडूसह दक्षिणेतील राज्यांमध्ये यामुळे पाऊस बरसत आहे. याचा परिणाम महाराष्ट्र राज्यावर देखील दिसून येतोय. फेंगल चक्रीवादळामुळे कमी दाबाचा पट्टा आता वायव्येकडे सरकत आहे. परिणामी महाराष्ट्रात पुढील ३ दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (Maharashtra Weather)

3 व 4 डिसेंबरदरम्यान कोकण व मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे. ऐन थंडीत आता पाऊस पडणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता

हवामान विभागाने तळकोकणातील सिंधूदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्याला यलो अलर्ट दिला असून बुधवारी सिंधूदुर्ग, रत्नागिरी, सातारा, कोल्हापुरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे, सोलापूर, सांगली, तसेच मराठवाड्यातील धाराशिव, लातूर नांदेड जिल्ह्यातही हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा आता वायव्येकडे सरकत असल्याने राज्यात सध्या असणारी कडाक्याची थंडी कमी होण्याची शक्यता आहे. वातावरण दमट व ढगाळ राहणार असून कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. (Maharashtra Weather)

आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली

‘फेंगल’ चक्रीवादळाचा परिणाम हा काही पिकांवर होण्याची शक्यता आहे. कारण, याचा परिणाम हा कोकणावर दिसून येतोय. दोन दिवसापूर्वी तापमानात कमालीची घट झाली होती. मात्र आता तापमानात वाढ होत असल्याने हिवाळ्यात दमट वातावरण तयार झाले आहे. त्यातच पाऊस पडण्याचा अंदाज असल्याने आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

देशातील हवामानाबद्दल बोलायचे झाल्यास, काश्मीरच्या खोऱ्यामध्ये तापमान शुन्याहून कमी झालं असून, हिमाचल प्रदेशातील अनेक भागांमध्ये बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे.उत्तराखंडमधील पर्वरांगांमध्येही बर्फवृष्टीसाठी पूरक वातावरण तयार होत आहे. तर, दिल्लीत थंडीचा कडाका वाढला आहे. (Maharashtra Weather)

News Title- Maharashtra Weather Update 2 December 2024  

महत्वाच्या बातम्या-

12th Fail फेम अभिनेत्याच्या चाहत्यांना धक्का!, सोशल मीडियावर माहिती देत अभिनयाला केला राम राम

महिन्याच्या सुरुवातीलाच आनंदवार्ता! पेट्रोल-डिझेल ‘इतक्या’ रुपयांनी झालं स्वस्त?

“महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर…”; जरांगे पाटलांची नवी मोठी घोषणा

सिनेविश्वात खळबळ, प्रसिद्ध अभिनेत्रीचा ‘त्या’ अवस्थेत आढळला मृतदेह

आज भोलेनाथ ‘या’ राशींवर राहणार प्रसन्न, प्रत्येक कामात मिळणार यश!

Join WhatsApp Group

Join Now