राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता!

On: December 24, 2024 11:20 AM
Weather Update
---Advertisement---

Weather Update l राज्यात अवकाळी पाऊस वारंवार हजेरी लावत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अशातच आता हवामान विभागाने तीन दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह गारपिट होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं आहे.

वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता :

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा सक्रीय पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे अरबी समुद्रात देखील आर्दता वाढली आहे. मात्र आता त्याचा परिणाम राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात दिसून येणार आहे. कारण राज्यातील या भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे.

राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 26 डिसेंबर आणि 28 डिसेंबरदरम्यान जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच 27 डिसेंबरला वादळी पावसासह गारपीट होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. कारण गेल्या अनेक दिवसांपासून किमान तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील थंडी देखील कमी झाली असून पुढील काही दिवसात किमान तापमानात 2-4 अंश सेल्सियसने वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Weather Update l ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी? :

दरम्यान, यावर्षीचा शेवट हा वादळी पावसानं होणार असल्याचं हवामान विभागाच्या अंदाजावरून दिसतं आहे. तसेच राज्यातील अनेक भागाला हवामान खात्याने पावसाचा यलो अलर्ट देखील दिला आहे.

26 डिसेंबर : धुळे, जळगाव, नाशिक, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी केला आहे.

27 डिसेंबर : नाशिक, पुणे,जळगाव, अहमदनगर, धुळे, नंदूरबार, जालना, परभणी,बीड, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी केला आहे.

News Title – separate recharge plans for calling and SMS, TRAI orders

महत्त्वाच्या बातम्या-

ट्रायने मोबाईल रिचार्ज संदर्भात घेतला सर्वात मोठा निर्णय!

गुड न्यूज! लाडक्या बहीणींनो आजपासून खात्यात जमा होणार पैसे, 1500 की 2100 मिळणार?

प्रसिद्ध गायकाच्या बिल्डिंगला भीषण आग, मोठी जीवितहानी…

‘मुलांना सांता नाही संत बनवा’, नितेश राणेंचं ट्वीट चर्चेत

“तुझाही संतोष देशमुख केला जाईल”; सत्ताधारी आमदाराच्या पुतण्यांना थेट धमकी

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now