हवामान विभागाने सावध राहण्याचं केलं आवाहन! यामागचं कारण काय?

On: December 5, 2024 2:36 PM
Solapur Rain Update
---Advertisement---

Weather Update l आजकाल हवामानात वारंवार बदल होत आहे. यामुळे ऐन हिवाळ्यातील थंडी देखील गायब झाली आहे. अशातच आता हवामान खात्याने राज्यातील शेतकऱ्यांना सावधगिरी बाळगायला लावली आहे. कारण राज्यातील अनेक जिल्ह्याना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.

‘या’ जिल्ह्यात पाऊस हजेरी लावणार? :

सध्या महाराष्ट्रामध्ये थंडी काही अपेक्षित प्रभाव पाडताना दिसत नाही. मात्र नोव्हेंबर महिन्यामध्ये थंडीनं जोर धरण्यास सुरुवात केली असतानाच बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या फेंगल चक्रीवादळामुळं राज्यातील हवामानात मोठे बदल झाले आहेत.

मात्र आता राज्यात 7 डिसेंबरपर्यंत हवामान ढगाळ राहणार असून राज्यातील अनेक जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यानच्या काळात सिंधुदुर्ग, सातारा, यवतमाळ, चंद्रपूर, सोलापूर, गडचिरोली, सांगली, कोल्हापूर, परभणी, नांदेड या जिल्ह्यांसह लगतच्या परिसरात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Weather Update l कोणत्या जिल्ह्यांना कधी यलो अलर्ट जारी :

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या फेंगल चक्रीवादळामुळे हवामानात झालेले हे बदल राज्यात दिसत आहेत. त्यामुळे सोलापूर, कोकण, मध्य महाराष्ट्र व दक्षिण मराठवाड्याला वादळी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांनी देखील अलर्ट राहावे असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहेत.

कोल्हापूर – 5, 6, 7 डिसेंबर
सांगली – 5, 6 डिसेंबर
पुणे – 5 डिसेंबर
लातूर – 5 डिसेंबर
धाराशिव – 5 डिसेंबर
सोलापूर – 5 डिसेंबर
सातारा – 5 डिसेंबर
रत्नागिरी – 5 डिसेंबर
सिंधुदुर्ग – 5, 6 डिसेंबर

News Title : Maharashtra Weather Update

महत्त्वाच्या बातम्या-

‘या’ तारखेला होणार 33 मंत्र्याचा शपथविधी, कोणाला किती मंत्रिपदं मिळणार?

मोठी बातमी! गृहखात्याच्या बदल्यात शिवसेनेला ‘हे’ महत्त्वाचं खातं मिळणार

‘मैं समंदर हूं, लौटकर आऊंगा…’, तरुण महापौर ते मुख्यमंत्री; फडणवीसांचा थक्क करणारा प्रवास

एकनाथ शिंदेंचं ठरलं! मोठा निर्णय घेतला

“शिंदेंमध्ये दिल्लीसोबत पंगा घ्यायची हिंमत नाही, त्यामुळे…”; संजय राऊतांनी डिवचलं

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now