महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट, वादळ आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा

On: August 12, 2024 10:35 AM
Weather Update
---Advertisement---

Weather Update l गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात मोठ्या प्रमाणात बदलत दिसत आहे. अशातच आता पुन्हा एकदा महाराष्ट्रातील हवामानात बदल होणार आहे. हवामान खात्याने 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. यासोबतच वादळ आणि वीज पडण्याचा इशारा देखील दिला आहे. मुंबईतील बहुतांश भागात आज ढगाळ वातावरण असणार आहे. त्यामुळे मुंबईत हलका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी :

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा आणि वाशीमसह महाराष्ट्रातील अनेक भागात यलो अलर्ट जारी केला आहे. आता पुण्यासह राज्याच्या काही भागात पावसाचा जोर कमी होताना दिसत आहे. मात्र राज्याच्या बहुतांश भागात मान्सूनची कामगिरीही अपवादात्मक ठरली आहे.

राज्यातील हिंगोली वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. काही जिल्ह्यांत मुसळधार पाऊसही पडला आहे. त्यात पुणे, सातारा आणि कोल्हापूरचा समावेश आहे. आयएमडीच्या आकडेवारीनुसार सांगलीत 63 टक्के तर पुणे जिल्ह्यात 62 टक्के अधिक पाऊस झाला आहे. या पावसाळ्यातील पर्जन्यमानाच्या अभ्यासानुसार महाराष्ट्रातील 36 पैकी 25 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याचे समोर आले आहे.

Weather Update l ‘या’ तारखेनंतर पाऊस पुन्हा सक्रिय होणार :

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, 15 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रासह मध्य भारताच्या भागात कमी पाऊस पडणार आहे. मात्र 16 ऑगस्टनंतर ते 23-24 ऑगस्टच्या आसपास मध्य भारतातील भागात पुन्हा एकदा मान्सूनच्या हालचाली तीव्र होण्याची शक्यता आहे.

अशातच देशाची राजधानी दिल्लीत सलग सहाव्या दिवशी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दिल्लीतील बहुतांश भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. याबाबत यलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आज दिवसभर ढगांची हालचाल सुरू राहणार आहे.

News Title : Maharashtra Weather Update

महत्त्वाच्या बातम्या- 

या राशीवर महादेवाची कृपा राहणार!

लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर!

मोठी बातमी! मराठा आंदोलकांनी शरद पवारांना घेरलं

सिद्धार्थ मल्होत्राचा नको तसला व्हिडीओ व्हायरल, सर्वांसमोर केलं असं काही की…

“आम्ही घटस्फोट घेत आहोत…”, अभिषेक बच्चनच्या खुलाशाने खळबळ

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now