Maharashtra Weather | आज 12 सप्टेंबररोजी राज्यात कोणत्या भागात पाऊस होईल आणि कुठे पाऊस ओसरणार, याबाबत हवामान विभागाने महत्वाचा इशारा दिला आहे. येत्या काही दिवसांमध्ये पाऊस राज्यातून निरोप घेणार असल्याचं आयएमडीने म्हटलं आहे. सध्या कोकण आणि विदर्भात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. (Maharashtra Weather)
मध्य भारतात सक्रिय असणारं कमी दाबाचं क्षेत्र सध्या विरळ होऊ लागलं आहे. त्यामुळे पावसाचा जोर कमी होऊ लागला आहे. आज पुणे आणि साताऱ्यासह पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे येथे यलो अलर्ट जारी करण्यात आलाय.
विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा इशारा
राज्याच्या उर्वरित भागात पावसाचा जोर कमी झाला आहे. विदर्भात मात्र अजूनही जोरदार पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
याचबरोबर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.(Maharashtra Weather)
राज्यातून पाऊस परतीच्या वाटेवर
पुढच्या दोन दिवसांत दक्षिण कोकणासह नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिह्यांमधील घाट परिसरातही पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. पठारी भागात मध्यम सरींचा अंदाज आहे, तर मध्य महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव येथे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे(Maharashtra Weather)
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली येथे देखील वीजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. मात्र, येथे आज कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही. या भागात सध्या ढगाळ वातावरण तयार झाले आहे. दुपारून पाऊस त्यानंतर ऊन असं वातावरण येथे सध्या दिसून येतंय.
News Title : Maharashtra Weather today 12 september
महत्वाच्या बातम्या-
आज गौरी विसर्जनाच्या दिवशी ‘या’ 5 राशींना देवी करणार धनवान!
‘या’ राशींनी आज सावध राहावे, तुमच्या हळव्या स्वभावाचा फायदा घेतला जाऊ शकतो!
वडिलांच्या मृत्यूने आभाळ कोसळलं, मलायकाचा पहिला VIDEO समोर






