Maharashtra Weather News | महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. आज अनेक ठिकाणी पावसाचा ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. आज पुन्हा एकदा राज्यात हवामान विभागाकडून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Maharashtra Weather News)
मान्सूनचे वारे अचानक सक्रिय झाल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने पुणे, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांना तीन दिवस अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.
‘या’ 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
गणपतीच्या आगमनालाच आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. IMD ने बहुतांश भागात 9 सप्टेंबरपर्यंत यलो, तर पुणे, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांना 7 ते 9 सप्टेंबरपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी केलाय. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे. (Maharashtra Weather News)
7 ते 9 सप्टेंबरदरम्यान कोकणासह पुणे, सातारा घाटमाथा भागात अतिवृष्टीची शक्यता आहे. त्यामुळे घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वर्धा येथे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मराठवाडा-विदर्भात पावसाचा जोर वाढणार
तर, मराठवाड्यातील धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेडसह काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा पाऊस होईल. येथे वाऱ्याचा वेग हा ताशी 30 ते 40 किलोमीटर असेल. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Maharashtra Weather News)
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्र, कोकण घाटासह विदर्भात पावसाचा आज अधिक जोर असेल. त्यामुळे पुढील 24 तास हे धोक्याचे असणार आहेत. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून त्याचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होण्याची शक्यता आहे. यामुळे पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला आहे.
News Title – Maharashtra Weather News September 7
महत्त्वाच्या बातम्या-
खुशखबर! कोट्यवधी तरुणांना बँकेत मिळणार नोकरी, जाणून घ्या सविस्तर
बाप्पाच्या प्रतिष्ठापनेचा शुभ मुहूर्त कोणता?, जाणून घ्या पूजेला लागणारे साहित्य व मंत्र
आज ‘या’ 4 राशींवर राहील बाप्पाची कृपा, सर्व मनोकामना होतील पूर्ण
विनेश फोगाट राजकीय मैदान गाजवणार, कॉँग्रेसमध्ये प्रवेश करताच मिळालं विधानसभेचं तिकीट
गणपती बाप्पाच्या आगमनाने संकटे होतील दूर, ‘या’ राशींचे येणार सुवर्णदिवस






