Weather Alert | ऑगस्ट महिन्याचा शेवट होत असतानाही राज्यातील पावसाची तीव्रता काहीशी कमी झालेली नाही. कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आज, ३० ऑगस्ट रोजीदेखील अनेक भागांत पावसाच्या सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबईत हलक्या ते मध्यम सरी तर कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मुंबई आणि उपनगरांचा अंदाज :
मुंबईत सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. दुपारनंतर काही ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. आज शहराचे किमान तापमान २५ अंश तर कमाल तापमान ३१ अंश सेल्सियस राहणार आहे. (Maharashtra Weather Alert)
दक्षिण-पश्चिमेकडून मध्यम वेगाने वारे वाहतील. शहरात पाणी साचण्याची विशेष शक्यता नाही, मात्र दमट हवामान कायम राहील. ठाणे आणि नवी मुंबई परिसरात देखील अशीच स्थिती असून दुपारनंतर मुसळधार सरींचा अनुभव येऊ शकतो.
पालघर जिल्ह्यातील परिस्थिती :
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने आज यलो अलर्ट जारी केला आहे. सकाळपासून रिमझिम सरी सुरू असून दुपारी व रात्रीच्या सुमारास मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तापमान २४ ते २९ अंश सेल्सियसदरम्यान राहील. समुद्र उग्र राहण्याची शक्यता असून २५ ते ३० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील. त्यामुळे मासेमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. (Maharashtra Weather Alert)
पालघर जिल्ह्यात आज हलक्या ते मध्यम सरींची नोंद होईल. समुद्रकिनारी भागांत संध्याकाळकडे पावसाचा जोर वाढू शकतो. येथील तापमान २५ ते २९ अंश सेल्सियसदरम्यान राहील. २० ते २५ किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे किनारी भागातील मासेमारांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.






