Weather Alert | सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. देशाच्या अनेक भागांत मुसळधार पावसासह वादळी वारे सुरू असून, महाराष्ट्रातही पुढील २४ तासांत तुफान पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. विशेषतः पुणे, मुंबई, कोकण किनारपट्टी, विदर्भ आणि मराठवाडा भागासाठी हवामान विभागाने तीव्र इशारे (Red/Orange/Yellow Alert) जारी केले आहेत.
पावसाचे कारण काय? :
बंगालच्या उपसागरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय झाली असून, त्यातून कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे मान्सूनची तीव्रता वाढली असून, पुढील काही दिवसांत हा कमी दाबाचा पट्टा वायव्य दिशेने सरकून महाराष्ट्रावर मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
राजस्थानच्या मध्यभागीही चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, त्यामुळे मान्सूनचा पाऊस अजून वेगाने खेचला जात आहे. (Maharashtra Weather Alert)
कुठे किती इशारे? :
आज (२ सप्टेंबर):
विदर्भातील चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट
उर्वरित विदर्भ, संपूर्ण मराठवाडा, नाशिक व उत्तर महाराष्ट्रासाठी येलो अलर्ट
पुणे, सातारा, कोल्हापूर घाटमाथा आणि कोकण किनारपट्टीवर येलो अलर्ट
३ सप्टेंबर:
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर घाटमाथा, चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, नगर, बीड, परभणी, हिंगोली, जालना, संभाजीनगर, संपूर्ण विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना येलो अलर्ट
४ सप्टेंबर:
रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, पुणे, सातारा, कोल्हापूर व नाशिक घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट
सिंधुदुर्ग, मुंबई, नगर, संभाजीनगर, जालना, जळगाव, धुळे, नंदुरबार व विदर्भाला येलो अलर्ट
५ सप्टेंबर:
रायगड व पुणे घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट
मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, नाशिक घाटमाथ्यासह उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट (Maharashtra Weather Alert)
Weather Alert | पुढील सात दिवसांचा अंदाज :
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, गुजरात, कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाडा या भागात सातत्याने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तीन ते पाच सप्टेंबरदरम्यान विशेषतः कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.






