Maharashtra Weather Alert | राज्यात गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. परतीच्या मान्सूनच्या पार्श्वभूमीवर बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रामुळे हवामानात पुन्हा मोठा बदल झाला आहे. हवामान विभागाने पुढील ४८ तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगत नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
कमी दाब क्षेत्रामुळे हवामान अस्थिर :
पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाब क्षेत्रामुळे दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. हे कमी दाब क्षेत्र अधिक तीव्र होऊन किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस होण्याचे अंदाज वर्तवले गेले आहेत.
कोणत्या जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट? :
हवामान विभागाच्या माहितीनुसार, २६ ते ३० सप्टेंबर दरम्यान पावसाचा जोर कायम राहणार आहे.
यलो अलर्ट : ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे (Pune heavy rain), सातारा, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर. (IMD yellow Yellow alert)
ऑरेंज अलर्ट : विशेषतः २७ व २८ सप्टेंबर रोजी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा आणि लातूर जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसाची शक्यता. (IMD yellow orange alert)
Maharashtra Weather Alert | मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पूरस्थिती :
गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आधीच पूरस्थिती निर्माण झाली होती. (Maharashtra Weather Alert)
आता पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याने नदी-नाल्यांना पूर येण्याचा धोका आहे. शेतकरी आणि नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि धोकादायक भागात जाणे टाळावे, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.






