राज्यात ‘या’ दिवशी विधानसभेची आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता?

On: October 14, 2024 11:20 AM
Local Body Elections
---Advertisement---

Vidhansabha Election l लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वांना विधानसभा निवडणुकीची उत्सुकता लागली आहे. कारण लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात राजकीय संघर्ष पाहायला मिळाला आहे. मात्र आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक खलबतं सुरु आहेत. मात्र विधानसभा निवडणुकीची लवकरच घोषणा होणार असल्याचं सध्याच्या राजकीय घडामोडींवरून दिसत आहे.

विधानसभेची आचारसंहिता लागू होणार? :

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी जाहीर होणार आणि आचारसंहिता कधी लागू होणार यासंदर्भात अनेक चर्चा रंगल्या आहेत. मात्र आता आचारसंहितेबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवसाच्या आत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

विधानसभा निवडणूक आधीच लांबल्यामुळे विधानसभेची आचारसंहिता अगदी कोणत्याही क्षणाला लागू शकते. कारण उद्या निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार आहे. त्यावेळी राज्याच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. याशिवाय मंत्रालयात देखील मोठ्या प्रमाणात हालचाली असल्याने सुट्टीच्या दिवशी देखील मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत.

Vidhansabha Election l विधानसभेत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी सामना रंगणार :

अशातच काल रविवारी सुट्टी असताना देखील सामाजिक न्याय विभागाचे सात शासन निर्णय जारी करण्यात आले आहे. तसेच आज महायुती सरकारची ही शेवटची मंत्रिमंडळाची बैठक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे.

यंदाची विधानसभा निवडणूक ही अत्यंत अटीतटीची आणि चुरशीची असणार आहे. कारण या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. त्यामुळे थेट नागरिकांशी संबंधित असलेल्या योजना सुरु करण्याचा धडाका महायुती सरकारने लावला आहे. मात्र आता कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे.

News Title : Maharashtra Vidhansabha Election date

महत्वाच्या बातम्या-

शाहरुख खानच्या मुलावर अभिनेत्रीचा गंभीर आरोप; म्हणाली, “तो मला प्रायव्हेट व्हिडिओ..”

राष्ट्रवादीचा अजून एक नेता बिश्नोई गँगच्या टार्गेटवर?, धक्कादायक माहिती समोर

बाबा सिद्दिकी हत्येनंतर भाजप नेत्याचा सलमान खानला मोठा सल्ला; थेट म्हणाले..

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन?, आणखी एका आरोपीला अटक

आज सोमवार, महादेवाची ‘या’ राशींवर असणार कृपादृष्टी!

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now