राज्यात कोणत्या पक्षाचं किती संख्याबळ?, वाचा सर्व माहिती एका क्लिकवर

On: October 15, 2024 1:11 PM
Maharashtra Vidhansabha Election 2024
---Advertisement---

Maharashtra Vidhansabha Election 2024 | काही दिवसांपूर्वीच हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. आता संपूर्ण देशाचं लक्ष हे महाराष्ट्रांकडे लागलं आहे.आज (15 ऑक्टोबर) भारत निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे. आज दुपारी 3:30 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. त्यामध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. (Maharashtra Vidhansabha Election 2024 )

2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजप हा 105 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यावेळी भाजप आणि शिवसेना युती होती. त्यावेळी एकसंघ शिवसेना 56 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर होती. भाजप-शिवसेना युतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी लढली होती. 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस 54 जागांसह तिसऱ्या, काँग्रेस 44 आमदारांसह चौथ्या क्रमांकावर होती.

महायुती आणि महाविकास आघाडी बलाबल

महायुती- एकूण 162 जागा
(भाजप (105), शिवसेना (56), रासप (01), रिपाइं, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम)

महाविकास आघाडी- एकूण 105 जागा
(राष्ट्रवादी (54), काँग्रेस (44), बहुजन विकास आघाडी (03), शेकाप (01), स्वाभिमानी (01), समाजवादी पक्ष (02) (Maharashtra Vidhansabha Election 2024 )

2019 मध्ये कुणाला किती जागा मिळाल्या होत्या?

एकूण – 288 जागा
भाजप – 105
शिवसेना – 56
राष्ट्रवादी – 54
काँग्रेस – 44
बहुजन विकास आघाडी – 03
प्रहार जनशक्ती – 02
एमआयएम – 02
समाजवादी पक्ष – 02
मनसे – 01
माकप – 01
जनसुराज्य शक्ती – 01
क्रांतिकारी शेतकरी पक्ष – 01
शेकाप – 01
रासप – 01
स्वाभिमानी – 01
अपक्ष – 13 (Maharashtra Vidhansabha Election 2024 )

राज्यातील सध्याची राजकीय स्थिती-

महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांत दोन मोठी पक्ष फुटली आहेत. सर्वप्रथम शिवसेना पक्षाचे दोन गट पडले. राज्यात आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना ही भाजपसोबत सत्तेत आहे. तर, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे देखील दोन गट पडले आहेत. यापैकी अजित पवार गट देखील सत्तेत आहे. तर, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि राष्ट्रवादी विरोधी पक्ष आहेत. त्यामुळे यंदा होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. लोकसभेत राज्यात महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं. तर, महायुतीला म्हणावी तशी छाप पाडत आलेली नाही. त्यामुळे विधानसभासाठी महायुती आता कसून तयारीला लागली आहे. यंदा महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना होणार आहे. (Maharashtra Vidhansabha Election 2024 )

जिल्हयानुसार सर्व जागांची माहिती

अहमदनगर- एकूण 12 जागा (अकोले, कर्जत जामखेड, कोपरगाव, नेवासा, पारनेर, राहुरी, संगमनेर, शेवगाव, शिर्डी, श्रीगोंदा, श्रीरामपूर (एससी), अहमदनगर शहर)

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) – एकूण 09 जागा (औरंगाबाद मध्य , औरंगाबाद पश्चिम, औरंगाबाद पूर्व, गंगापूर, कन्नड, पैठण, फुलंब्री, सिल्लोड, वैजापूर)

बुलढाणा- एकूण 07 जागा (बुलढाणा, चिखली, जळगाव (जामोद), खामगाव, मलकापूर, मेहकर, सिंदखेडराजा)

गडचिरोली – एकूण 03 जागा (अहेरी , आरमोरी, गडचिरोली)

जळगाव – एकूण 11 जागा (अमळनेर, भुसावळ , चाळीसगाव, चोपडा , एरंडोल, जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, जामनेर, मुक्ताईनगर, पाचोरा, रावेर)

लातूर – एकूण 06 जागा (अहमदनगर, औसा, लातूर शहर, लातूर ग्रामीण, निलंगा, उदगीर) (Maharashtra Vidhansabha Election 2024 )

नागपूर – एकूण 12 जागा (हिंगणा, कामठी, काटोल, नागपूर दक्षिण-पश्चिम, नागपूर दक्षिण, नागपूर पूर्व, नागपूर मध्य, नागपूर पश्चिम, नागपूर उत्तर, रामटेक, सावनेर, उमरेड)

नाशिक – एकूण 15 जागा (बागलान , चांदवड, देवळाली, दिंडोरी, इगतपुरी, कळवण, मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य, मांडगाव, नाशिक पूर्व, नाशिक मध्यम, नाशिक पश्चिम, निफाड, सिन्नर, येवला)

परभणी – एकूण 04 जागा (गंगाखेड, जिंतूर, परभणी, पाथरी)

रत्नागिरी – एकूण 05 जागा (चिपळूण, दापोली, गुहागर, राजापूर, रत्नागिरी)

सिंधुदुर्ग – एकूण 03 जागा (कणकवली, कुडाळ, सावंतवाडी)

वर्धा – एकूण 04 जागा (आर्वी, देवळी, हिंगणगाठ, वर्धा)

अकोला- एकूण 05 जागा (अकोला पश्चिम, अकोला पूर्व, अकोट, बाळापूर, मूर्तिजापूर )

बीड – एकूण 06 जागा (आष्टी, बीड, गेवराई, केज, माजलगाव, परळी)

चंद्रपूर – एकूण 06 जागा (बल्लारपूर, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, चिमूर, राजुरा, वरोरा)

गोंदिया – एकूण 04 जागा (आमगाव, अर्जुनी मोरगाव, गोंदिया, तिरोरा) (Maharashtra Vidhansabha Election 2024 )

जालना – एकूण 05 जागा (बदनापूर, भोकरदन, घनसावंगी, जालना, परतूर)

मुंबई शहर – एकूण 10 जागा (भायखळा, कुलाबा, धारावी , माहीम, मलबार हिल, मुंबादेवी, शिवडी, सायन कोळीवाडा, वडाळा, वरळी)

मुंबई उपनगर – एकूण 26 जागा (अंधेरी पश्चिम, अंधेरी पूर्व, अणुशक्तीनगर, भांडुप पश्चिम, बोरिवली, चांदिवली, चारकोप, चेंबूर, दहिसर, दिंडोशी, घाटकोपर पश्चिम, घाटकोपर पूर्व, गोरेगाव, जोगेश्वरी पूर्व, कालिना, कांदिवली पूर्व, कुर्ला, मागाठणे, मालाड पश्चिम, मानखुर्द शिवाजीनगर, मुलुंड, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, वर्सोवा, विक्रोळी, विलेपार्ले)

नांदेड – एकूण 09 जागा (भोकर, देगलूर, हदगाव, किनवट, लोहा, मुखेड, नायगाव, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण)

उस्मानाबाद – एकूण 04 जागा (उमरगा, उस्मानाबाद, परांडा, तुळजापूर)

पुणे – एकूण 21 जागा (आंबेगाव, बारामती, भोर, भोसरी, चिंचवड, दौंड, हडपसर, इंदापूर, जुन्नर, कसबा पेठ, खडकवासला, खेड, आळंदी, कोथरूड, मावळ, पर्वती, पिंपरी , पुणे कॅन्टोन्मेंट, पुरंदर, शिरूर, शिवाजीनगर)

सांगली- एकूण 08 जागा (इस्लामपूर, जत, खानापूर, मिरज, पलुस कडेगाव, सांगली, शिराळा, तासगाव-कवठेमहाकाळ)

सोलापूर – एकूण 11 जागा (अक्कलकोट, बार्शी, करमाळा, माढा, माळशिरस, मोहोळ, पंढरपूर, सांगोला, सोलापूर दक्षिण, सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर मध्य)

वाशिम – एकूण 03 जागा (कारंजा, रिसोड, वाशिम) (Maharashtra Vidhansabha Election 2024 )

अमरावती – एकूण 08 जागा (अचलपूर, अमरावती, बडनेरा, दर्यापूर, धामणगाव रेल्वे, मेळघाट, मोर्शी, तिवसा)

धुळे – एकूण 05 जागा (धुळे ग्रामीण, धुळे शहर, साक्री, शिरपूर, सिंधखेडा)

हिंगोली – एकूण 03 जागा (वसमत, हिंगोली, कळमनुरी)

कोल्हापूर- एकूण 10 जागा (चंदगड, हातकणंगले, इचलकरंजी, कागल, करवीर, कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ)

नंदुरबार – एकूण 04 जागा (अक्कलकुवा, नंदुरबार, नवापूर, शहादा)

पालघर – एकूण 06 जागा (डहाणू, बोईसर, नालासोपारा, पालघर, वसई, विक्रमगड)

रायगड – एकूण 07 जागा (अलिबाग, कर्जत, महाड, पनवेल, पेण, श्रीवर्धन, उरण)

सातारा – एकूण 08 जागा (कराड दक्षिण, कराड उत्तर, कोरेगाव, माण, पाटण, फलटण, सातारा, वाई)

ठाणे – एकूण 18 जागा (ऐरोली, अंबरनाथ, बेलापूर, भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व, भिवंडी ग्रामीण, डोंबिवली, कल्याण पश्चिम, कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण, कोपरी-पाचपाखाडी, मिरा-भाईंदर, मुंब्रा-कळवा, मुरबाड, ओवळा-माजिवडा, शहापूर, ठाणे, उल्हासनगर)

यवतमाळ – एकूण 07 जागा (आर्णी, दिग्रस, पुसद, राळेगाव, उमरखेड, वणी, यवतमाळ) (Maharashtra Vidhansabha Election 2024 )

भंडारा – एकूण 03 जागा (तुमसर, भंडारा, साकोली)

News Title :  Maharashtra Vidhansabha Election 2024
महत्वाच्या बातम्या-

बोपदेव घाटातील प्रकरण ताजं असतानाच पुण्यात घडली आणखी एक धक्कादायक घटना!

आचारसंहिता म्हणजे काय? ‘या’ दरम्यान कोणत्या गोष्टींवर बंदी असते?

थोड्याच वेळात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार!

भाजपसह मनसेला मोठं खिंडार, माजी आमदारासह बड्या नेत्याचा कॉँग्रेसमध्ये प्रवेश

विधानसभेपूर्वीच कॉँग्रेसला धक्का, ‘या’ विद्यमान आमदाराचा अजित पवार गटात प्रवेश

Join WhatsApp Group

Join Now