गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांसाठी आयोगाचा महत्त्वाचा निर्णय!

On: October 15, 2024 5:26 PM
Maharashtra VidhanSabha Election 2024
---Advertisement---

Maharashtra VidhanSabha Election | मागच्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील जनतेच लक्ष ज्या तारखांकडे लागलेलं, त्या जाहीर झाल्या आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन या तारखा जाहीर केल्या आहेत.

महाराष्ट्रात 26 नोव्हेंबरआधी नवं सरकार बनणार आहे. त्याआधी निवडणूक (Maharashtra VidhanSabha Election) घ्यावी लागेल, असं राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला सांगितलं. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 मतदारसंघ आहेत. महाराष्ट्रात 1 लाख 186 मतदार केंद्र राहतील. या मध्ये 57 हजार 601 ग्रामीण पोलिंग स्टेशन आणि 42 हजार 582 शहरी पोलिंग स्टेशन राहतील, असं राजीव कुमार यांनी सांगितलं.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ही एकाच फेजमध्ये होणार आहे. संपूर्ण राज्यात एकाच दिवशी मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. यावेळी बोलताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महत्त्वाची माहिती दिली.

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना पेपरमध्ये तीनवेळी माहिती द्यावी लागणार आहे. सर्व पोलिंग स्टेशन दोन किलोमीटरच्या आत असावेत, यासाठी निवडणूक आयोगाचा प्रयत्न आहे. तसेच मतदानासाठी रांगा असल्या तर त्या ठिकाणी खुर्ची ठेवण्यात येणार आहे. यामुळे ज्येष्ठ मतदार किंवा महिलांना त्या ठिकाणी काही वेळ खुर्चीवर बसता येणार आहे. तसेच मतदान केंद्रांमध्ये मतदारांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा असणार आहे.

विधानसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज करण्याची तारीख ही 22 ऑक्टोबरपासून सुरु होईल. उमेदवार 29 ऑक्टोबरपर्यंत आपला अर्ज दाखल करु शकणार आहेत. यानंतर 30 ऑक्टोबरला सर्व उमेदवारांच्या अर्जाची छाननी होईल. तर 4 नोव्हेंबर 2024 ला पर्यंत उमेदवार आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकणार आहेत, अशी माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली आहे. 25 नोव्हेंबरपर्यंत निवडणुकीचा कार्यक्रम पूर्ण होणार आहे.

मतदारांना कोणत्याही प्रकारचे प्रलोभन देणे, पैसे वाटप करणे, ड्रग्स वाटप करणे, दारूचे वाटप करणे यावर निवडणूक आयोगाचे बारीक लक्ष असणार आहे. सर्वत्र चेकपोस्टवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. 24 तास चेकींग होणार आहे. एक्साईजचे अधिकारी आणि इतर अधिकारी चेक पोस्टवर राहतील, असं राजीव कुमार यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! अखेर निवडणुकीची तारीख जाहीर

अजितदादांना मोठा धक्का! ‘या’ दिग्गज नेत्यानी सोडली साथ

बीड जिल्ह्यात कुणाचं पारडं जड?, शरद पवार अन् जरांगे पॅटर्न का येतंय चर्चेत?

‘या स्टेप्स फॉलो करा अन् घरबसल्या तपासा मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही?

लाडक्या बहिणींना मिळणार 5500 रुपयांचा दिवाळी बोनस; या 3 अटी लागू

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now