Maharashtra l राज्यात विधानसभा निवडणुकीची सर्वत्र तयारी सुरु आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती हे घटक पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.. मात्र या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या जागा वाटपासंदर्भात एक माहिती समोर आली आहे.
भाजप ‘इतक्या’ जागांवर निवडणूक लढवणार? :
येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप पक्ष सर्वाधिक म्हणजेच तब्बल160 जागा लढणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजप गेल्यावेळी प्रमाणे जेवढ्या जागा लढल्या तेवढ्याच जागा यंदाच्या विधानसभेला देखील लढणार असून त्यासाठी कंबर देखील कसल्याची माहिती मिळत आहे. तसेच भाजपने कार्यकर्त्यांना लवकरात लवकर कामाला लागण्याच्या सूचना देखील पक्षश्रेष्ठींकडून देण्यात आल्या आहेत.
तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे आगामी विधानसभा निवडणुका 10 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर दरम्यान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कारण 28 नोव्हेंबरच्या आधी राज्यात नवी विधानसभा अस्तित्वात येणं आवश्यक आहे.
Maharashtra l भाजप उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करणार :
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, मतदानाचे सर्व टप्पे संपल्यानंतर किमान एक दिवस गॅप ठेवून मतमोजणी करणं आवश्यक असतं. त्यामुळे या सर्व गोष्टी लक्षात घेता महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकांचे टप्पे 10 ते 20 नोव्हेंबर दरम्यान येतील अशी मिळाली आहे.
याशिवाय भाजप आणि महायुतीला लोकसभा निवडणुकीत उमेदवार उशिरा जाहीर केल्याचा फटका देखील बसला होता. त्यामुळे यंदा आगामी विधानसभेला भाजप उमेदवारांना कामाला लागण्याच्या सूचना आधी देणार आहे. तसेच येत्या 23, 24 नोव्हेंबरला बैठक होणार आहे तर 2 ऑक्टोबरनंतर भाजप पहिल्या 50 उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करणार असल्याची माहिती मिळत आहे.
News Title : Maharashtra Vidhansabha Election Date
महत्वाच्या बातम्या –
सणासुदीच्या काळात खाद्य तेलाच्या किंमती वाढणार का?
राज्यात मॉन्सून पुन्हा सक्रिय, ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी
कॅनरा बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! तब्बल ‘इतक्या’ जागांसाठी भरती सुरु






