BJP | राज्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तसंच 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी ताकदीने मैदानात उतरली आहे.
निवडणुकीची घोषणा होताच महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटप आणि उमेदवारी निश्चितीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. अशात भाजपच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. भाजपकडून मुंबईत राम कदम यांच्यासह पाच आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.
5 आमदारांचा पत्ता कट होणार?
भाजपचे शीव- कोळीवाडा येथील विद्यमान आमदार तमिळ सेल्वन यांचे तिकीट कापून त्यांच्या जागी प्रसाद लाड किंवा राजश्री शिरवडकर यांना तिकीट मिळणार असल्याची चर्चा आहे. वर्सोव्यात भारती लव्हेकर यांच्या ऐवजी संजय पांडे यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. घाटकोपर पश्चिम येथे राम कदम यांचा पत्ता कट होणार असल्याची माहिती आहे.
राम कदम हा भाजपचा प्रसारमाध्यमांवर सातत्याने झळकणारा चेहरा होता. मात्र, सुमार कामगिरीचे कारण देत भाजप नेतृत्त्वाकडून त्यांना यंदा उमेदवारी दिली जाणार नाही, अशी माहिती समोर येत आहे. कारण लोकसभा निवडणुकीत राम कदम यांच्या मतदारसंघात भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा हे पिछाडीवर पडले होते.
राम कदम यांना भाजपने उमेदवारी नाकारल्यास घाटकोपर पश्चिम मतदारसंघात महायुतीकडून कोण रिंगणात उतरणार, याची उत्सुकता आता सर्वांना लागली आहे.
BJP | पहिली यादी जाहीर होणार
भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी उद्या जाहीर होणार आहे. महाराष्ट्रात भाजप पक्ष संघटनेकडून केंद्रीय नेतृत्वाकडे विविध नेत्यांच्या उमेदवारीसाठी यादी पाठवण्यात आली आहे. भाजपकडून जाहीर करण्यात येणाऱ्या या पहिल्या यादीत कुणाची वर्णी लागणार? हे पाहावं लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
बजाज कंपनी दमदार बाईक लाँच करणार; जाणून घ्या फीचर्स व किंमत
सलमान खानचा गेम करण्यासाठी बिश्नोई गँगनी दिली ‘इतक्या’ लाखांची सुपारी!
“छान साडी घालणं आणि फक्त…”; रूपाली ठोंबरेंनी रूपाली चाकणकरांना सुनावलं
राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत पुढील 24 तासात जोरदार पावसाची शक्यता!
मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण? शरद पवारांनी जाहीर केलं बड्या नेत्याचं नाव






