राज्यपाल नियुक्त 12 आमदारांपैकी 7 जणांची नावे ठरली; पाहा कुणाला लागली लॉटरी?

On: October 15, 2024 8:43 AM
Maharashtra Vidhan Parishad Governor appointed MLA list
---Advertisement---

Maharashtra Vidhan Parishad | राज्यात विधानसभा निवडणुकांचा बिगूल लवकरच वाजणार आहे. राज्यात आचारसंहिता कधीही लागू शकते. अशात राज्य सरकारकडून राज्यपाल नियुक्त 12 जागांबाबत अत्यंत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. रिक्त असलेल्या या 12 जागांपैकी 7 जणांची नावे ठरली असल्याची माहिती समोर आली आहे. (Maharashtra Vidhan Parishad)

राज्य सरकारकडून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांपैकी 7 आमदारांची नावं राज्यपालांकडे पाठवण्यात आली आहे. तर, 5 जागा या रिक्त ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये भाजपला 3 जागा, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला प्रत्येकी 2 जागा देण्यात आल्या आहेत.

7 आमदारांची नावे ठरली, मात्र 5 जागा अद्यापही रिक्त

सोमवारी या संदर्भातील फाइल पाठवण्यात आली. मात्र, अद्याप नियुक्तीचे कोणतेही आदेश देण्यात आले नाहीत. विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त 12 जागांचा तिढा बऱ्याच काळापासून प्रलंबित होता. मविआ सरकार असताना राज्यपालांनी या यादीच्या मंजुरीला विलंब केला होता. त्यामुळे हे प्रकरण तेव्हा कोर्टात गेले होते. मात्र, आता विधानसभेपूर्वीच महायुती सरकारकडून या जागांची नियुक्ती व्हावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

यामध्ये भाजपला 3, अजित पवार गटाला 2 तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 2 जागा देण्यात आल्या आहेत. भाजपकडून विधानपरिषद आमदार म्हणून पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यासह विक्रांत पाटील आणि बाबू सिंग महाराज राठोड यांना संधी देण्यात आली आहे. (Maharashtra Vidhan Parishad)

‘या’ नेत्यांची लागली वर्णी

तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ आणि सांगली-मिरज-कुपवाडचे माजी महापौर इद्रिस नायकवडी यांना संधी दिली आहे. यासोबतच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने माजी खासदार हेमंत पाटील आणि मनीषा कायंदे यांना विधानपरिषदेवर संधी दिल्याची माहिती आहे.

राज्यपाल नियुक्त 12 पैकी 7 जागांवर राजकीय नेत्यांची वर्णी लागल्याचे यातून पाहायला मिळत आहे. मात्र. 5 जागा रिक्त का सोडण्यात आल्या, याबाबत आता वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत. सध्या तरी विधानसभेपूर्वीच या 7 नेत्यांची लॉटरी लागल्याची चर्चा आहे.   (Maharashtra Vidhan Parishad)

News Title :  Maharashtra Vidhan Parishad Governor appointed MLA list

महत्वाच्या बातम्या-

आज मेष ते मीनपैकी ‘या’ राशींची होणार इच्छापूर्ती!

शरद पवारांचा मोठा डाव, अजित पवारांना बसला धक्का

‘बाबा सिद्धीकींची हत्या करणाऱ्यांना फाशी देणार’; मुख्यमंत्र्याचं मोठं विधान

उद्धव ठाकरे रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल, प्रकृतीबद्दल महत्त्वाची माहिती समोर

सिद्दीकींच्या हत्येसाठी आरोपींनी आणला होता पेपर स्प्रे? यामागचं धक्कादायक कारण समोर

Join WhatsApp Group

Join Now