टीईटी परीक्षेसंदर्भात मोठी बातमी समोर!

On: October 4, 2025 1:26 PM
Maharashtra TET 2025
---Advertisement---

TET Exam | महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे होणारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी-२०२५) संदर्भात उमेदवारांसाठी एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. राज्यातील पूर आणि अतिवृष्टीमुळे अर्ज भरताना आलेल्या अडचणी लक्षात घेऊन परीक्षा परिषदेने ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. (Maharashtra TET 2025)

अर्ज नोंदणी प्रक्रियेला मुदतवाढ :

सदर परीक्षेसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत यापूर्वी ३ ऑक्टोबर २०२५ पर्यंत होती. मात्र, आता उमेदवारांना ४ ऑक्टोबर २०२५ पासून ते ९ ऑक्टोबर २०२५ रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज भरण्यासाठी अतिरिक्त कालावधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

अर्ज नोंदणी प्रक्रियेला ३ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. या पूरस्थितीमुळे यामुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात प्रचंड नुकसान झाले. वाहतूक व्यवस्था व इतर तांत्रिक समस्या निर्माण झाल्या. त्यामुळे ‘टीईटी’ परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्यात उमेदवारांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे, अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. (Maharashtra TET 2025)

TET Exam | विविध संघटनांकडून मुदतवाढीचा मागणी :

दरम्यान, ही शिक्षक पात्रता परीक्षा (Maharashtra TET 2025)  नियोजित तारखेनुसार रविवार, २३ नोव्हेंबर २०२५ रोजीच होणार आहे. अर्ज भरण्याच्या मुदतीत वाढ झाल्याने, पात्र उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशन अशा अनेक संघटना, विद्यार्थ्यांनी राज्यातील परिस्थितीमुळे मुदतवाढ देण्याची मागणी परीक्षा परिषदेकडे केली होती. अर्ज भरण्यास येणाऱ्या अडचणी लक्षात घेत परीक्षा परिषदेने शुक्रवारी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला.

News title : Maharashtra TET Exam Breaking News

Join WhatsApp Group

Join Now