मोठी बातमी! पावसामुळे मुंबई-पुणे-मुंबई रेल्वे वाहतूक बंद, प्रवाशांचे प्रचंड हाल

On: July 25, 2024 6:05 PM
Maharashtra Rain Update Mumbai-Pune railway traffic stopped
---Advertisement---

Maharashtra Rain Update | पुण्यात पावसाने अनेक रेकॉर्ड तोडले आहेत. मुसळधार पावसाने पुणे जलमय झाले आहे.अनेक नागरिक पाण्यामुळे अडकले आहेत. पुण्यासह मुंबई, ठाणे, कल्याणमध्ये देखील जोरदार पाऊस बरसत आहे. पावसाने रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. त्यातच मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला (Maharashtra Rain Update) आहे.

सध्या कर्जत ते कल्याण वाहतूक बंद असून पुणे-मुंबई मध्य रेल्वे मार्गावरील काही महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे, पुण्याला जाणाऱ्या आणि पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या पहिली ते बारावीच्या शाळांना आज सुट्टी देण्यात आली आहे. पुण्यात देखील शाळांना सुट्टी देण्यात आली.

पावसाने मुंबई-पुण्यात धुमाकूळ

हवामान विभागाने मुंबईसह, पुण्याला रेड अलर्ट दिला आहे. कल्याण मधील शिवाजीनगर परिसरामध्ये वालधुनीच्या कडेला असणाऱ्या 200 हून अधिक नागरिकांच्या घरांमध्ये गुडघाभर पाणी शिरले आहे.पावसामुळे घरातील सामानाचे अतोनात नुकसान झाले आहे.

पुण्यात देखील घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत.अजूनही घरात अडकलेल्या लोकांना अग्निशमन दलाच्या जवानांकडून यशस्वीरित्या सुखरुप सुरक्षितस्थळी पोहोचवले जात आहे. पुण्याच्या खडकवासला धरणातून गुरुवारी पहाटे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे (Maharashtra Rain Update) पुणे शहर व आसपासच्या अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे.

मुंबईहुन-पुण्याकडे जाणाऱ्या ‘या’ एक्सप्रेस रद्द

डेक्कन क्वीन एक्सप्रेस
प्रगती एक्सप्रेस

आज पुण्याहून-मुंबईकडे जाणाऱ्या या एक्सप्रेस रद्द
इंटरसिटी एक्सप्रेस

उद्या पुण्याहून-मुंबईकडे जाणाऱ्या या एक्सप्रेस रद्द

डेक्कन एक्स्प्रेस
प्रगती एक्सप्रेस

उद्या मुंबईहुन-पुण्याकडे जाणाऱ्या या एक्सप्रेस रद्द

इंटरसिटी एक्सप्रेस

News Title – Maharashtra Rain Update Mumbai-Pune railway traffic stopped

महत्त्वाच्या बातम्या-

पुण्यावर जलसंकट! रस्त्यांना नदीचे रूप, अनेक इमारती पाण्याखाली; पाहा Video

पूरजन्य परिस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला नागरिकांना धीर; म्हणाले..

“माझी तीन दुकानं बुडाली, त्याचा खर्च कोण देणार?”; संतप्त पुणेकराचा सवाल

“कोणत्याही परिस्थितीत सत्तेत बसणार, विधानसभा स्वबळावर लढणार”; राज ठाकरेंची मोठी घोषणा

पावसाळ्यात लोणावळ्यातील ‘या’ स्पॉटला जाण्याचा मोह आवरा; अन्यथा…

Join WhatsApp Group

Join Now