राज्यात पावसाचा धुमाकूळ! अनेक ठिकाणी शाळांना सुट्ट्या, ‘या’ भागांना आज हायअलर्ट

On: July 22, 2024 11:39 AM
Maharashtra Rain Update 22 july 
---Advertisement---

Maharashtra Rain Update | राज्यातील अनेक ठिकाणी सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. रस्त्यावर पाणी साचल्याने बऱ्याच ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली आहे. पावसाने जनजीवन (Maharashtra Rain Update) विस्कळीत झाले आहे.

हवामान विभागाने आज (22 जुलै) बऱ्याच भागांना हायअलर्ट दिला आहे. पूर्व विदर्भात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडाऱ्यातील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

विदर्भाला पावसाने झोडपून काढलं

आज नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासन सतर्क झाले आहे. पालघर जिल्ह्यात पावसाने सलग चार दिवस दमदार हजेरी लावली. आजही येथे सकाळपासूनच रिमझिम सुरू आहे.

काल 21 जुलैरोजी डहाणू शहरामध्ये सर्वाधिक 315 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर तलासरी तालुक्यालाही पावसाने झोडपून काढलं. तलासरी तालुक्यातील कोमगाव येथून वाहणाऱ्या (Maharashtra Rain Update) गावघात नदीला पूर आल्यामुळे या पुरात एक महिला वाहून गेल्याची माहिती मिळाली आहे. याचसोबत सूर्या आणि वैतरणा नद्यांनाही मोठा पूर आला आहे.

कोल्हापुरात प्रशासन सतर्क, पंचगंगा नदीच्या पातळीत वाढ

भंडारा जिल्ह्याला देखील पावसाने झोडपून काढलं आहे. आसगावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले. यामुळे घरात अनेक लोक अडकली आहेत. घरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याकरिता जिल्हा शोध आणि बचाव पथक आसगाव येथे पोहोचलेला आहे. आज भंडारामधील शाळांना देखील सुट्टी देण्यात आली आहे.

कोल्हापूरमध्ये तर प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. येथील पंचगंगा नदीच्या पातळीत वाढ झाल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी ही 38 फूट 10 इंच इतकी पोहोचली आहे. जिल्ह्यातील 84 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. यामुळे येथील गावांना खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे. एकंदरीत (Maharashtra Rain Update) पाहता राज्यात मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.

News Title –  Maharashtra Rain Update 22 july 

महत्त्वाच्या बातम्या- 

आज ‘या’ राशीच्या व्यक्तींच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील!

विधानसभेपूर्वीच कॉँग्रेसला झटका! ‘हा’ आमदार भाजपाच्या वाटेवर?

‘मैदानात उतरा आणि ठोकून काढा’; देवेंद्र फडणवीसांचा कार्यकर्त्यांना आदेश

राज्यातील ‘या’ भागात पावसाचा धुमाकूळ, नागरिकांना मोठा फटका

ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाची चर्चा, तो मित्र ठरतोय तिसरा व्यक्ती?

Join WhatsApp Group

Join Now