सावधान! हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट

On: July 19, 2024 10:14 AM
Maharashtra Rain Update 19 july
---Advertisement---

Maharashtra Rain Update | हवामान विभागाने आज 19 जुलैरोजी काही जिल्ह्यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. रत्नागिरी, सातारा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांत आज अति मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला (Maharashtra Rain Update) आहे.

या भागातील नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. तसेच गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. येथे विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचा पाऊस होण्याचा अंदाज आहे.

‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी

एखाद्या भागात जेव्हा अतिमुसळधार किंवा अतिवृष्टीचा अंदाज असतो अशा वेळी रेड अलर्ट जारी करण्यात येतो. रेड अलर्ट म्हणजे मोठ्या संकटाची शक्यता. हवामान विभागाने आज (Maharashtra Rain Update)वरील सहा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.

याशिवाय, पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, अमरावती, नागपूर आणि वर्धा यासह इतर आठ जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ऑरेंज अलर्ट हा आगामी हवामान परिस्थितीसाठी तयार राहण्याचा इशारा आहे.

इतर भागात कसं राहील हवामान?

तर विदर्भातील इतर काही जिल्ह्यांसह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. याचबरोबर कोल्हापूर आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दुसरीकडे, मुंबईत सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. पश्चिम उपनगरात आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. आज (Maharashtra Rain Update)सकाळपासून जोरदार पाऊस असल्यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे.

News Title – Maharashtra Rain Update 19 july 

महत्त्वाच्या बातम्या-

विठ्ठलाचं दर्शन घेऊन परतणारी वारकऱ्यांची जीप थेट विहिरीत कोसळली; 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू

चार वर्षांच्या संसारानंतर हार्दिक-नताशा विभक्त; घटस्फोटानंतर नताशाला किती रक्कम मिळणार?

घराबाहेर पडण्यापुर्वी ही बातमी नक्की वाचा!

आज ‘या’ राशींना सूर्यदेवाच्या कृपेने मोठा धनलाभ होणार!

“तुला लई प्रेम असेल तर देवेंद्र फडणवीसांसोबत लग्न कर”, मनोज जरांगेंचं प्रसाद लाड यांना प्रत्युत्तर

Join WhatsApp Group

Join Now