सोलापुरात राजकीय भूकंप, शिंदे व अजितदादा गटाचे दोन बडे नेते महाविकास आघाडीत

On: September 5, 2024 12:51 PM
Maharashtra politics Two leaders of Ajit Pawar group in Solapur went to MVA
---Advertisement---

Maharashtra politics | आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच महायुतीला धक्क्यावर धक्के बसत आहेत. महायुतीमधील अनेक नेत्यांनी पुन्हा घरवापसी केली आहे. तर, काही जण उमेदवारीवरून पक्षाला रामराम करत आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचा विश्वास वाढला आहे. सर्वाधिक इनकमिंग उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटात सुरू आहे. अशात सोलापूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. (Maharashtra politics)

सोलापूर जिल्ह्यात महायुतीला मोठा धक्का बसला आहे. येथील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील दोन नेत्यांनी महाविकास आघाडीत प्रवेश केला आहे. अजित पवार गटाच्या दोन स्थानिक नेत्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे शिंदे आणि अजितदादा गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.

माढा मतदारसंघात अजितदादा गटाला मोठा धक्का

अजित पवार गटाच्या दोन नेत्यांनी काल जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. यामुळे माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदे हे माढा विधानसभा मतदारसंघातून सलग सहा वेळा निवडून आले आहेत. मात्र, या विधानसभेच्या निवडणुकीतून त्यांनी माघार घेतली आहे. त्यानंतर त्यांनी आपले सुपुत्र रणजीत शिंदे यांना माढ्यातून उमेदवारी जाहीर केली आहे. अशात त्यांचे कट्टर समर्थक असलेल्या दोन नेत्यांनी त्यांची साथ सोडली आहे.(Maharashtra politics)

जयंत पाटलांच्या उपस्थितीत टेभुर्णीच्या सुरज देशमुख आणि रावसाहेब देशमुख या बंधूंनी शरद पवार गटात पक्ष प्रवेश केलाय. राजकीय वर्तुळात विजयसिंह मोहिते पाटलांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश झाल्याची चर्चा आहे. तर, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख डी. एस.सावंत यांनी देखील शिंदे गटाला रामराम केला आहे. आमदार शहाजी बापू पाटलांच्या चुकीच्या कार्य पद्धतीमुळे पक्ष सोडला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

शिंदे गटाच्या नेत्याचा पक्षाला जय महाराष्ट्र

पक्ष सोडताना त्यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगले असले तरी जिल्हातले पदाधिकारी, आमदार हे नीट वागत नाहीत. त्यामुळे मी पक्षातून बाहेर पडलोय. माझा फक्त ट्रेलर होता. मी पहिले पाऊल टाकले असून येत्या काळात अनेक पक्ष प्रवेश होतील, असा इशाराच त्यांनी दिला आहे.(Maharashtra politics)

News Title –  Maharashtra politics Two leaders of Ajit Pawar group in Solapur went to MVA

महत्त्वाच्या बातम्या-

भारतात सर्वाधिक टॅक्स भरणाऱ्यांमध्ये शाहरुख खान अव्वल, आकडा ऐकून थक्क व्हाल

निवडणुकीआधीच भाजपला मोठे झटके; यादी जाहीर होताच राजीनाम्याची लाट

महत्वाची बातमी! तुमच्या हक्काच्या पैशांसाठीचा नियम बदलला

“अरे मर्दांनो उठा, त्या ‘फिक्की’चा माज उतरवा..”; पुष्कर जोग निक्की तांबोळीवर भडकला

दुलिप ट्रॉफी स्पर्धेला सुरवात; जाणून घ्या स्पर्धेची A टू Z माहिती

Join WhatsApp Group

Join Now