Maharashtra Politics | राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. यंदा महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना रंगणार आहे. शिवसेनेत फुट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. लोकसभा निवडणुकीवेळी उद्धव ठाकरे तसेच महाविकास आघाडीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर जोरदार हल्ला करण्यात आला. आता विधानसभेतही हे राजकीय द्वंद्व रंगणार आहे. अशात उद्धव ठाकरे यांच्या गटातील नेते मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी अमित शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रात्री 12च्या ठोक्याला त्यांनी शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा रंगली आहे. (Maharashtra Politics)
मिलिंद नार्वेकरांच्या अमित शाहांना शुभेच्छा
अमित शाहा आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांवर सतत शाब्दिक हल्लाबोल केला आहे. अमित शाहा यांनी महाराष्ट्र दौऱ्यावर नेहमीच उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना टार्गेट केलं आहे. अशात ठाकरे गटाचे विधानपरिषदचे आमदार, सचिव व उद्धव ठाकरेंचे स्विय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनी अमित शाहा यांना शुभेच्छा दिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
मिलिंद नार्वेकर यांनी सोमवारी रात्री 12 वाजून 23 मिनिटांनी अमित शाहा यांना एक्स पोस्टच्या (पूर्वीचे ट्वीटर) माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छामुळे कार्यकर्ते व नेते नाराज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.एकीकडे उद्धव ठाकरे आणि अमित शहा एकमेकांविरोधात लढत असताना दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील बड्या नेत्याने अमित शहा यांच्या वाढदिवशी शुभेच्छा देण्यासाठी दाखवलेली तत्परता चर्चेचा विषय ठरत आहे. (Maharashtra Politics)
गेल्या काही महिन्यात अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर कडाडून टीका केलेली आहे. ही टीका नार्वेकर विसरले काय?, त्यांना शुभेच्छा द्यायची इतकी घाई का?, अशी कुजबूज आता राजकीय वर्तुळात सुरू आहे. अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अत्यंत कडू शब्दांत टीका केली आहे.
मिलिंद नार्वेकरांचं ट्वीट चर्चेत
तर, उद्धव ठाकरेंनी ज्यांना अहमदशाह अब्दालीचा वंशज म्हटलं त्याच अमित शाह यांना त्यांच्याच पक्षातील नेत्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्याने याची जोरदार चर्चा रंगली आहे. मिलिंद नार्वेकर यांचं हे ट्वीट आता नवीन वादाचं कारण ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बारा वाजल्यानंतर काही वेळातच मिलिंद नार्वेकर यांनी शुभेच्छा देण्यासाठी दाखवलेली तत्परता अनेकांच्या पचनी पडलेली नाही. त्यामुळे सध्या मिलिंद नार्वेकर यांच्या ट्वीटचीच चर्चा रंगली आहे. (Maharashtra Politics)
Warm birthday greetings to Union Home Minister Shri @AmitShah ji. pic.twitter.com/LIXFBtnsp6
— Milind Narvekar (@NarvekarMilind_) October 21, 2024
News Title : Maharashtra Politics Milind Narvekar wishes Amit Shah
महत्वाच्या बातम्या –
पुण्यात सापडलेलं 5 कोटी घबाड कुणाचं?; संजय राऊत म्हणाले,’काय झाडी..काय डोंगर’
मोठी बातमी! पुण्यात बड्या नेत्याच्या कारमधून 5 कोटींचं घबाड जप्त
आज मंगळवारी, कोणत्या राशीला मिळणार शुभवार्ता?; वाचा सर्व 12 राशींचे राशीभविष्य






