“..पेक्षा सत्तेतून बाहेर पडलेलं बरं”; अजित पवारांच्या जवळच्या नेत्याचं विधान, नेमकं काय घडलं?

On: August 30, 2024 11:10 AM
Maharashtra Politics Dispute in mahayuti
---Advertisement---

Maharashtra Politics | शिंदे गटाचे धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी एका कार्यक्रमावेळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीबद्दल खळबळजनक विधान केलं. त्यांनी राष्ट्रवादीसोबत असल्याने उलट्या होतात, असं म्हटलं आहे. यामुळे अजित पवार गट चांगलाच भडकला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमधील घटक पक्षाचा वाद आता समोर आला आहे. तानाजी सावंत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. (Maharashtra Politics)

“मी एक कट्टर शिवसैनिक आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी आपले आयुष्यात कधीच पटले नाही. शाळेत असल्यापासून आतापर्यंत त्यांच्यासोबत कधीच पटले नाही. आम्ही कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर आल्यानंतर उलट्या होतात. ते सहन होत नाही.”, असं धक्कादायक विधान तानाजी सावंत (Tanaji Sawant)यांनी केलं आहे.

तानाजी सावंत यांचं वादग्रस्त विधान

तानाजी सावंत नागरिकांशी संवाद साधतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यामध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीची आपल्याला अॅलर्जी आहे. पुडी खाल्ल्यावर जशी उलटी होते तशी. आम्ही तत्वाशी बांधील आहोत, असंही सावंत म्हणाले आहेत. (Maharashtra Politics)

तानाजी सावंत यांच्या या विधानावर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तानाजी सावंत जे बोलले ते ऐकून घेण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडलेले बरं, अशी नाराजी उमेश पाटील यांनी बोलून दाखवली. तसेच, महायुती झाली म्हणून सावंत मंत्री झाले, हे त्यांनी विसरू नये असंही पाटील म्हणाले.

उमेश पाटील यांची सत्तेतून बाहेर पडण्याची भाषा

उमेश पाटील यांनी थेट सत्तेतून बाहेर पडण्याचं विधान केल्याने राज्यभर याची एकच चर्चा रंगली आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला म्हणावे तसे यश मिळाले नाही. निकालानंतर आरएसएसने अजित पवार गटाला सोबत घेतल्याने फटका बसला, असं म्हटलं होतं. अशात शिंदे गटाच्या नेत्याने मनातली सल बोलून दाखवल्याने अजित पवार गटाला ही टीका जिव्हारी लागू शकते. यामुळे राजकीय वर्तुळात आता अजित पवार महायुतीतून बाहेर पडणार काय?, अशा चर्चा रंगत आहेत. (Maharashtra Politics)

दरम्यान, आमदार अमोल मिटकरी यांनी देखील सावंत यांच्या वक्तव्यावर ट्वीट करत प्रत्युत्तर दिलं आहे. “जे खेकड्यामुळे धरण फुटले म्हणू शकतात , हाफकिन संस्थेला माणुस म्हणु शकतात,इतकंच काय आपला बुम ता. परंडा जि. धाराशिव येथील भैरवनाथ साखर कारखान्याचे उद्घाटन पवार साहेबांच्या हस्ते करू शकतात, दादांकडून निधी घेऊ शकतात ते काहीही बोलु शकतात.”, असा टोला मिटकरी यांनी लगावला आहे.

News Title – Maharashtra Politics Dispute in mahayuti

महत्त्वाच्या बातम्या-

“राष्ट्रवादीसोबत असल्याने उलट्या होतात, मला अ‍ॅलर्जी.. “; शिंदे गटाच्या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

शिवरायांचा पुतळा कोसळण्यामागे ठाकरे गटाच्या नेत्याचा हात?, निलेश राणेंचा गंभीर आरोप

महाराष्ट्रात धडकणार मोठं संकट, पुढील 24 तास धोक्याचे?; IMD चा स्पष्ट इशारा

गुड न्यूज! पेट्रोल ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त?, जाणून घ्या लेटेस्ट दर

आज लक्ष्मीच्या कृपेने ‘या’ राशी होणार धनवान, सर्व अडचणीही दूर होणार!

Join WhatsApp Group

Join Now