Beed | बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणावरून संपूर्ण महाराष्ट्र पेटलाय. अशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडच्या पालकमंत्रिपदाबाबत एक महत्त्वपूर्ण इशारा दिला आहे, जो राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना मोठा धक्का देण्याच्या दृष्टीने पाहिला जाऊ शकतो.
फडणवीसांचा मुंडेंना इशारा
बीड (Beed) जिल्ह्यातील राजकीय समीकरणे आणि पालकमंत्रिपदाची वाटप प्रक्रिया सध्या तीव्र रूप घेत आहे. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे की पालकमंत्रिपदाचे वाटप करताना जिल्ह्यातील आमदारांची संख्या याचा विचार केला जाईल. हे वक्तव्य धनंजय मुंडे यांच्यासाठी एक प्रकारचा इशारा मानला जातोय. कारण मुंडेंना बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळण्याची आशा आह
बीडचं पालकमंत्री कोण होणार?
बीड जिल्ह्यात पालकमंत्रिपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे आणि भाजपच्या पंकजा मुंडे यांच्यात चढाओढ सुरू आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे की जिल्ह्यात ज्या पक्षाचे जास्त आमदार असतील, त्या पक्षाला पालकमंत्रिपद दिलं जाईल. बीड जिल्ह्यात भाजपचे आमदार अधिक असल्याने, पंकजा मुंडे यांना पालकमंत्रिपद मिळण्याची शक्यता जास्त आहे.
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणालो?
बीडचा पालकमंत्री पद कोणी घ्यायच, यासंदर्भात मी, अजित दादा आणि शिंदे साहेब मिळून ठरवू अस म्हणत बीडमध्ये कोणाचीही दादागिरी आम्ही चालू देणार नाही, असं फडणवीस म्हणालेत.
महत्त्वाच्या बातम्या-
संतोष देशमुखांच्या हत्येविरोधात विरोधक प्रचंड आक्रमक! घेतला सर्वात मोठा निर्णय
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! मुख्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण योजनेची केली घोषणा
“संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं”; नवीन खुलासा समोर
“1500 रुपये देण्यासाठी बहीणींच्या नवरे व भावांना बेवडे बनवणार”; ‘या’ नेत्याचा हल्लाबोल
लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी होणार का? आदिती तटकरेंनी दिलं उत्तर






