Maharashtra Police Bharti GR | महाराष्ट्र राज्यातील तरुणांसाठी मोठी आनंदवार्ता आहे. राज्य सरकारने पोलीस दलात मेगा भरती प्रक्रिया राबविण्यास मान्यता दिली आहे. यासाठीचा शासन निर्णय (GR) जाहीर करण्यात आला असून, तब्बल 15,631 पदे भरली जाणार आहेत. यामध्ये पोलीस शिपाई, चालक, बॅण्डस्मन, सशस्त्र पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई यांचा समावेश आहे.
या भरतीला अलीकडेच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हिरवा कंदील मिळाला होता. विशेष म्हणजे, 2022 आणि 2023 मध्ये वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही यावेळी एकदाच संधी दिली जाणार आहे. त्यामुळे अनेक उमेदवारांना नव्याने संधी उपलब्ध झाली आहे. (Maharashtra Police Bharti GR)
कोणत्या पदांसाठी किती जागा? :
या भरतीत विविध संवर्गांतील रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे –
पोलीस शिपाई – 12,399
पोलीस शिपाई चालक – 234
बॅण्डस्मन – 25
सशस्त्र पोलीस शिपाई – 2,393
कारागृह शिपाई – 580
म्हणजेच एकूण 15,631 जागा उमेदवारांसाठी खुल्या होणार आहेत.
Maharashtra Police Bharti GR | परीक्षा पद्धत, शुल्क आणि विशेष तरतुदी :
सरकारने जाहीर केलेल्या निर्णयानुसार, भरती प्रक्रिया घटक स्तरावरून राबविण्यात येईल आणि OMR आधारित लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
खुल्या प्रवर्गासाठी परीक्षा शुल्क – ₹450
मागास प्रवर्गासाठी परीक्षा शुल्क – ₹350
याशिवाय परीक्षा शुल्कातून जमा होणारी रक्कम आवश्यकतेनुसार भरती प्रक्रियेसाठी वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. उमेदवारांचे अर्ज स्वीकृती, छाननी आणि इतर कामकाजासाठी बाह्य सेवापुरवठादार कंपनीची निवड करण्याचे अधिकार अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण आणि खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना देण्यात आले आहेत. (Maharashtra Police Bharti GR)
वयोमर्यादा शिथिलतेचा लाभ :
सामान्य प्रशासन विभागाच्या 2022 मधील दोन शासन निर्णयांतील तरतूदींमध्ये शिथिलता देऊन ही भरती होणार आहे. त्यामुळे 2022 आणि 2023 मध्ये वयोमर्यादा ओलांडलेले उमेदवारही एक वेळच्या विशेष बाब म्हणून या प्रक्रियेत सहभागी होऊ शकतील. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर उमेदवारांना संधी उपलब्ध झाली आहे.






