विरोधी पक्षनेते पद कोणाला मिळणार? नार्वेकरांनी दिली माहिती

On: December 11, 2024 12:33 PM
Maharashtra Opposition Leader
---Advertisement---

Maharashtra Opposition Leader l राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आली आहे. अशातच आता विशेष अधिवेशन देखील पार पडलं आहे. त्यानंतर आता विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबरपासून नागपूरमध्ये सुरू होणार आहे. मात्र या अधिवेशनात विरोधी पक्षनेते पद नेमकं कोणाला मिळणार? याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. मात्र यासंदर्भात धानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महत्त्वाचे वक्तव्य केलं आहे.

महाविकास आघाडीने विरोधी पक्षनेते पदाची केली मागणी :

विशेष अधिवेशनापूर्वी महाविकास आघाडीने विरोधी पक्षनेते पदाची मागणी केली आहे. विरोधी पक्षांसाठी आवश्यक असणारे संख्याबळ विरोधी पक्षाकडे दिली नाही. तसेच विरोधी बाकांवर सगळ्यात मोठा पक्ष हा महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट असून त्यांच्या 20 जागा निवडून आल्या आहेत.

त्यामुळे आता विरोधी पक्षासाठी एकूण सदस्य संख्येच्या 10 टक्के जागा एका पक्षाला मिळणे आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाने विरोधी पक्षनेते पदाची फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली असल्याची माहिती मिळाली आहे.

Maharashtra Opposition Leader l विरोधी पक्षनेते पदासाठी अद्याप अर्ज आलेला नाही :

शिवसेना ठाकरे गटाने दिल्ली पॅटर्नने विरोधी पक्षनेते पद द्यावे अशी मागणी केली केली होती. तर, विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी 10 टक्के संख्याबळाचा नियम नसल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी माहिती दिली आहे.

तसेच विरोधी पक्षनेते पदासाठी अद्याप कोणाकडूनही अर्ज आलेला नाही. तसेच विरोधकांकडून विरोधी पक्षनेते पदासाठी अर्ज आल्यानंतर विचार केला जाणार असल्याचे राहुल नार्वेकर यांनी सांगितले आहे. मात्र विरोधी पक्षनेते पदासाठी विरोधकांकडे आवश्यक संख्या बळ नसल्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षच विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

News Title – Maharashtra Opposition Leader

महत्वाच्या बातम्या-

अखेर मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात घेतला असा निर्णय?

संजय राऊतांच्या सख्ख्या भावाचा ठाकरेसेनेला घरचा आहेर; थेट म्हणाले…

‘पुष्पा 2’ चित्रपटासाठी अल्लू अर्जुनला मिळालं इतक्या कोटींचं मानधन!

राज्यातील ‘या’ जिल्ह्यात रक्त गोठवणारी थंडी, शाळांच्या वेळात मोठा बदल

मंत्रीपदासाठी इच्छुक व नाराजांसाठी एकनाथ शिंदे वापरणार ‘हा’ पॅटर्न?, चर्चेला उधाण

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now