‘या’ महिलांना मिळणार 10 हजारांचा लाभ? सरकारची नवीन योजना

On: August 7, 2024 10:41 AM
Ladki Bahin Yojana
---Advertisement---

New Scheme l केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. अशातच महाराष्ट्र सरकारनेही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. ज्या अंतर्गत महिलांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. अशातच आता या योजनेच्या धर्तीवर राज्य सरकार राज्यातील मोलकरणींसाठी एक अनोखी योजना आणण्याच्या तयारी असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यात मोलकरणींची संख्या सर्वात जास्त :

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनंतर आता असंघटित क्षेत्रातील मोलकरणींसाठी देखील राज्य सरकार लवकरच एक गृहोपयोगी साहित्य वाटपासंदर्भात योजना आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. यासंदर्भात राज्यातील तब्बल 10 ते 12 लाख घरगुती कामगार व मोलकरणींची संख्या असल्याची माहिती सरकारच्यावतीने जाहीर केली आहे.

राज्य सरकार राज्यातील घरगुती कामगार व मोलकरणींची संख्या लक्षात घेऊन ही योजना आणण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. यामध्ये राज्य सरकार स्वयंपाक घरातील कुकरसह तब्बल 21 भांड्यांचा संच देणार आहे. तसेच या संचची किंमत सुमारे 10 हजार रुपये असणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे या संचाच वाटप हे केवळ नोंदणी केलेल्या घरगुती मोलकरणींनाच होणार आहे.

New Scheme l या महिलांना मिळणार लाभ? :

सर्वात महत्वाचं म्हणजे बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठीची भोजन योजना तसेच कामावरील साहित्य संचवाटपाच्या धर्तीवरच नोंदणीकृत घरेलू कामगार व मोलकरणींसाठी 10 हजार रुपये किमतीची भांडी साहित्याचा संच देण्यात येणार आहे. मात्र राज्य सरकारने अद्याप याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.

राज्याचे जेष्ठ दिवंगत नेते आर. आर. पाटील उपमुख्यमंत्री असतानाच 10 लाख घरेलु कामगारांची संख्या असल्याची माहिती विधिमंडळात जाहीर करण्यात आली होती. त्यावर तत्कालीन कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील शिक्कामोर्तब केलं होतं. मात्र आता 12 ते 13 लाख घरेलू कामगार असून, त्यामध्ये तब्बल 99 टक्के महिला आहेत.

News Title : Maharashtra New Scheme Ladaki Molkarin Yojana

महत्त्वाच्या बातम्या-

विनेश फोगटचा गोल्ड मेडलसाठीचा LIVE सामना कधी व कुठे पाहता येणार?

रितेश देशमुखबद्दल जिनिलियाने केला सर्वात मोठा खुलासा!

अनन्या पांडेने हिप सर्जरी केली?; ‘त्या’ फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ

हवेलीत पार पडली ‘अजित मॅरेथॅान’, प्रतिक्षा बाजारे यांच्याकडून आयोजन

मनोज जरांगे पाटील 7 तारखेपासून पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर; असा असणार दौरा

 

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now