महाराष्ट्रात नवीन राजकीय पक्षाची स्थापना होणार? कोण करणार

On: November 24, 2024 5:26 PM
Anjali Damania
---Advertisement---

Maharashtra l विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. अशातच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सर्वात मोठी घोषणा केली आहे. अंजली दमानिया यांनी महाराष्ट्रात नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा ट्विस्ट आला आहे.

परिवर्तन करण्यासाठी हा निर्णय घेतला :

राज्यात अंजली दमानिया यांनी परिवर्तन करण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसेच तत्व सिद्धांत यावर काम करणारे लोक या पक्षात असणार असल्याची माहिती मिळावी आहे. याशिवाय इथून तिथून उड्या मारणारे लोक या पक्षामध्ये नसणार असल्याचं त्यांनी म्हंटल आहे.

दमानिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायत ते स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुकीपासून आम्ही निवडणुका लढवणार असल्याचं त्यांनी म्हंटल आहे. तसेच हा पक्ष नव्हे तर ही क्रांती असणार आहे. तसेच हा सामन्यांचा पक्ष असणार आहे, असं देखील दमानिया यांनी म्हंटल आहे.

Maharashtra l पक्षाचं नाव काय असणार? :

दरम्यान, अंजली दमानिया यांच्या पक्ष काढण्याच्या निर्णयाने राज्यात आणखी एका नवीन राजकीय पार्टीचा उदय झाला आहे. तसेच अंजली दमानिया यांच्या नवीन पक्षाचे नेमकं नाव काय असणार? याबाबतची माहिती अद्याप देखील मिळालेली नाही.

तसेच राज्याचं राजकारण ही एक गटार गंगा झाली आहे. त्यामुळे निवडणुकीत मोठ्या पक्षाचा जनरल सेक्रटरी पैसे पाठताना पकडले गेल्याचे देखील अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.

News Title – Maharashtra New Political Party

महत्त्वाच्या बातम्या-

महायुतीतील 6 नेत्यांना मिळणार विधानपरिषदेची संधी, कोणाला लागणार लॉटरी?

निकालानंतर ‘या’ मोठ्या पदावर अजित पवारांची नियुक्ती!

संभाव्य मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला समोर; कोणाला किती मिळणार मंत्रिपदं

निकालानंतर EVM विरोधात याचिका कोण दाखल करणार?

जरांगे फॅक्टरचा फायदा कुणाला?, सर्वाधिक मराठा आमदार कोणत्या पक्षाचे आले?

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now