Maharashtra | राज्यात लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज 5 ऑक्टोबररोजी देशातील दोन बडे नेते राज्य दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॉँग्रेस खासदार राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. निवडणुका तोंडावर असताना हा दौरा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत तर राहुल गांधी आज कोल्हापुरात येणार आहेत. (Maharashtra)
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं राहुल गांधी यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीआधी या दोन्ही नेत्यांच्या दौऱ्याला अधिक महत्वाचं मानलं जातंय. मोदी आज वाशिमसह ठाणे, नवी मुंबईतही विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते अनेक उपक्रमांचा शुभारंभ होणार आहे.
वाशिममध्ये सुमारे 23,300 कोटी रुपये खर्चाच्या कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्राशी संबंधित विविध उपक्रमांचा मोदींच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. तसेच बंजारा समाजाच्या समृद्ध वारशाचा गौरव करणाऱ्या बंजारा विरासत संग्रहालयाचे देखील मोदींच्या हस्ते उद्धाटन होईल.
‘असा’ असेल मोदींचा दौरा
आज सकाळी मोदी वाशिममध्ये येतील. 11.15 च्या सुमारास ते पोहरादेवी येथील जगदंबा माता मंदिरात दर्शन घेतील. वाशिम येथील संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराज यांच्या समाधीवरही ते श्रद्धांजली अर्पण करतील. त्यानंतर, सकाळी 11:30 वाजता बंजारा विरासत संग्रहालयाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन होईल. त्यानंतर दुपारी 12 वाजता ते सुमारे 23,300 कोटी रुपये खर्चाच्या कृषी आणि पशुपालन क्षेत्राशी संबंधित अनेक उपक्रमांचा शुभारंभ करतील. (Maharashtra)
याचबरोबर पंतप्रधान मोदी 9.4 कोटी शेतकऱ्यांना सुमारे 20,000 कोटी रुपयांचा पीएम किसान सन्मान निधीचा 18 वा हप्ता वितरित करतील. याशिवाय, पंतप्रधान नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सुमारे 2,000 कोटी रुपयांच्या 5व्या हप्त्याचेही वितरण करतील.
यानंतर दुपारी 4 वाजता, पंतप्रधान मोदी ठाणे येथे 32,800 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. सुमारे 12,200 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. याचबरोबर इतरही अनेक उपक्रमांचा शुभारंभ मोदींच्या हस्ते होणार आहे.
राहुल गांधी यांचा दौरा-
राहुल गांधी यांच्या हस्ते कोल्हापूरच्या कसबा-बावडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे. पुतळा परिसरात भव्य स्टेज उभारण्यात आलं आहे. पुतळा अनावरणानंतर राहुल गांधी उपस्थितांना संबोधित करणार आहेत. (Maharashtra)
News Title – Maharashtra Narendra Modi and Rahul Gandhi visit
महत्त्वाच्या बातम्या-
गुड न्यूज! राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार 4000 रुपये
सुख-समृद्धीने जीवन फुलेल, देवी चंद्रघंटा आज ‘या’ राशींना देणार आशीर्वाद!
आता ‘अहमदनगर’ नव्हे तर ‘अहिल्यानगर’; अहमदनगरच्या नामांतराला केंद्राने दिली मंजुरी
मोठा निर्णय! महाराष्ट्रातील गड किल्ल्यांवर असं कृत्य केल्यास तुरुंगात जावा लागणार
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबर, नोव्हेंबरचे पैसे ‘या’ दिवशी जमा होणार






