पुढील सहा महिन्यांत पुन्हा निवडणुका होणार?

On: November 25, 2024 3:55 PM
Maharashtra
---Advertisement---

Maharashtra l महाराष्ट्रात महायुतीला अभूतपूर्ण यश मिळाले आहे. कारण जनतेने महायुतीला कौल दिल्याने गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील सहा महिन्यांच्या आत होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

निवडणुका का रखडल्या होत्या? :

राज्यातील महापालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनेक वर्षांपासून रखडलेल्या आहेत. यामधील काही निवडणुका या तीन वर्षांपासून तर काही निवडणुका गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून रखडलेल्या आहेत. यामध्ये इतर मागासवर्ग समाजाचे आरक्षण आणि प्रभागरचना याबाबत न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती देखील मिळालेली आहे.

अशातच गेल्या अडीच वर्षांपूर्वी राज्यात ज्या पद्धतीने सरकार स्थापन झाले, त्या गोष्टींचा विचार करता या निवडणुका यापूर्वी घेण्याचा प्रयत्न केला असता, तर त्याचा सर्वात मोठा फटका हा राज्यात सत्ताधारी असलेल्या महायुती सरकारला बसला असता अशी भीती राजकीय नेत्यांना होती.

Maharashtra l निवडणुका पुढील वर्षात होणार का? :

विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यामुळे आता या रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांचा असणार आहे. मात्र आता या माहितीला महायुतीमधील ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे आता पुढील सहा महिन्यांत या निवडणुका होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

याशिवाय विधानसभा निवडणुकीच्या निकालावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे भवितव्य देखील ठरणार होते. तसेच या निवडणुकीत महायुती किंवा महाविकास आघाडीला कशाप्रकारे यश मिळते यावर या निवडणुका पुढील वर्षात होणार का? हे ठरणार होते. मात्र आता या निवडणुकीत महायुतीला यश मिळाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका तातडीने घेण्याचा प्रयत्न महायुतीकडून केला जाणार असल्याचं बोललं जात आहे.

News Title – Maharashtra Nagarpalika News

महत्त्वाच्या बातम्या-

अखेर अभिषेकने ऐश्वर्यावर भाष्य केलं, चर्चांना उधाण

निवडणूक होताच शेतकऱ्यांना सर्वात मोठा झटका!

निकालाबाबत मनोज जरांगेंचा खळबळजनक खुलासा!

…तर त्यावेळी माझी चूक झाली; अजित पवार नेमकं काय म्हणाले?

‘अरे ढाण्या थोडक्यात वाचलास’, अन् रोहित पवार अजितदादांच्या पायाच पडले; पाहा Video

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now